Water Supply Issue: चासकमान धरणातील पाण्याच्या ढिसाळ नियोजनामुळे कोंढापुरी (ता. शिरूर) परिसरातील दहापेक्षा अधिक गावांवर भीषण पाणीटंचाईची कुऱ्हाड कोसळली आहे. कोंढापुरीचा शासकीय तलाव कोरडा ठणठणीत पडल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कोंढापुरी येथे बैठक घेऊन प्रशासनाला धारेवर धरले..कोंढापुरी येथे चासकमानच्या पाण्यासंदर्भात शेतकऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर, पंचायत समितीचे उपसभापती रामभाऊ सासवडे व परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते..Pune Water Shortage: पुणे जिल्ह्यात १०४ टँकरद्वारे पाणीपुरवठा.चासकमानच्या पाण्याचे योग्य नियोजन झाले नसल्यामुळे हक्काचे पाणी नागरिकांना मिळालेले नाही, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे, शेतातील पिके जळून चालली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे..Irrigation Water Crisis: इंदापुरात शेतकरी पाण्यासाठी आक्रमक....या गावांत पाणीटंचाईबुरुंजवाडी, कोंढापुरी, गणेगाव खालसा, खंडाळे, पिंपरी दुमाला, पिंपळे खालसा, जातेगाव, वाघाळे, रांजणगाव गणपती, कासारी..आगामी नियोजनपाणी सोसायट्या स्थापन करणे,जिल्हाधिकाऱ्यांच्या राखीव कोट्यातील वेळ नदीत पाणी सोडण्यास भाग पाडणे,सिंचन भवन, जिल्हाधिकारी यांच्यासमोर पाणी प्रश्नाचे गांभीर्य मांडणे तसेच आंदोलनासाठी लढा उभारणे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.