नारळ जाती 
ॲग्रो गाईड

नारळाच्या कोणत्या जाती निवडाव्यात ?

प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी

उंच जाती वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) ः या जातीचे आयुष्यमान ८० ते १०० वर्षे असून, सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी ८० ते १०० फळे मिळतात. लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा) ः पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी १५० फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी १४० ते १८० ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण ७२ टक्के असते. प्रताप ः नारळाचा आकार मध्यम, गोल असून, झाड सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. या जातीच्या एका झाडापासून १५० नारळ मिळतात. फिलिपिन्स ऑर्डिनरी ः नारळ आकाराने फारच मोठे असतात. एका नारळापासून सरासरी २१३ ग्रॅम खोबरे मिळते, तर नारळाचे उत्पादन ९४ ते १५९ असून, सरासरी १०५ नारळ आहे.

ठेंगू जाती या जातीची झाडे उंचीने ठेंगू असतात आणि लवकर म्हणजे लागवड केल्यापासून तीन ते चार वर्षांनी फुलोऱ्यात येतात. रंगावरून ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम आहे.

संकरित जाती टी × डी (केरासंकरा) ः या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. एका झाडापासून सरासरी १५० नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण ६८ टक्के इतके असते. टी × डी (चंद्रसंकरा) ः फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रति वर्षी ५५ ते १५८ फळे असते, तर सरासरी उत्पादन ११६ फळे आहे. संपर्क : ०२३५२- २३५३३१, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

SCROLL FOR NEXT