आवळा लागवड
आवळा लागवड  
ॲग्रो गाईड

आवळा, चिकू लागवड

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

आवळा लागवड सात x सात मीटर अंतरावर करावी. लागवड करताना योग्य अंतरावर ६० सेंमी x ६० सेंमी x ६० सेंमी आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती आणि दोन घमेली शेणखत आणि एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरून ठेवावेत. जून महिन्यात जातिवंत कलमांची लागवड करावी. लागवड करताना एकाच जातीची कलमे न लावता दोन ते तीन जातींची लावावीत म्हणजे फळधारणा वाढून चांगले उत्पादन मिळते. लागवडीसाठी कांचन, कृष्णा, नीलम, चकैया या जाती निवडाव्यात. चिकू लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची, खोल व काळी जमीन निवडावी. लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल या जातींची निवड करावी. लागवडीसाठी १० मीटर बाय १० मीटर अंतरावर १ मीटर बाय१ मीटर बाय १ मीटर आकाराचे खड्डे करावेत. या खड्यात दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट, चार घमेली शेणखत आणि पोयटा मातीच्या मिश्रणाने खड्डा भरावा. लागवडीसाठी खिरणीच्या खुंटावर केलेली कलमांची निवड करावी. चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करू नये.

-  संपर्क : ०२४२६ - २४३८६१  कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT