The importance of protected farming 
ॲग्रो गाईड

संरक्षित शेतीचे महत्त्व

संरक्षित शेतीमध्ये हरितगृह किंवा शेडनेटगृहाचा समावेश होतो. हरितगृह, शेडनेटगृहाचा उपयोग फुले, भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे.रोपवाटिका तयार करणे. उतिसंवर्धन रोपांचे बळकटीकरण करणे. इत्यादींसाठी केला जातो.

डॉ. प्रल्हाद जायभाये

संरक्षित शेतीमध्ये हरितगृह किंवा शेडनेटगृहाचा समावेश होतो. हरितगृह, शेडनेटगृहाचा उपयोग फुले, भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे. भाजीपाला व शोभिवंत रोपांची रोपवाटिका तयार करणे. उतिसंवर्धन रोपांचे बळकटीकरण करणे. इत्यादींसाठी केला जातो. संरक्षित शेतीमध्ये हरितगृह किंवा शेडनेटगृहाचा समावेश होतो. हरितगृह, शेडनेटगृहाचा उपयोग खालीलप्रमाणे करता येतो.

  • फुले, भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे.
  • भाजीपाला व शोभिवंत रोपांची रोपवाटिका तयार करणे.
  • उतिसंवर्धन रोपांचे बळकटीकरण करणे.
  • भाजीपाला पिकांच्या जाती व बीज उत्पादन घेणे.
  • पिकांचे संशोधन व विकास करणे.
  • गारा, बर्फ या पासून संरक्षण करणे. 
  • खालील पिकांचे व्यापारी तत्त्वावर  उत्पादन घेता येते.

  • फुलपिके : प्रामुख्याने दांड्याच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. 
  • भाजीपाला : रंगीत ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी, कारली, घोसावळीचे उत्पादन घेतले जाते.
  • पालेभाज्या : बिगरहंगामी कोथिंबीर, मेथी, पालक, फुलकोबी, कोबी यांचे उत्पादन घेणे शक्य होते.  
  • परदेशी भाजीपाला : ब्रोकोली, झुकिनि, लेट्युस, लिक, पार्सेली इ.
  • औषधी पिके : हळद, आले, मीट, बसीगिल इ. 
  • फळे : स्ट्रॉबेरी, टरबूज, डाळिंब, द्राक्ष, केळी अशा संवेदनशील पिकांचे उत्पादन घेता येते. 
  • संरक्षित शेतीअंतर्गत येणाऱ्या आधुनिक शेती पद्धती 

  • व्हर्टिकल फार्मिंग (मजल्याची शेती), 
  • डीप फार्मिंग ‌(भूमिगत व्हर्टिकल फार्मिंग), 
  • हायड्रोपोनिक्स अथवा ॲक्वापॉनिक्स (मातीविना पाण्यावरील शेती) 
  • एअरोपोनिक्स (हवेमध्ये मुळांची वाढ करून केली जाणारी शेती).
  • या आधुनिक शेतीमध्ये घेतली जाणारी उत्पादने 

  • परदेशी व देशी पालेभाज्या, परदेशी फुले, डच गुलाब, शेवंतीचे विविध प्रकार इ. 
  • जनावरांसाठी हिरवा चारा आणि ताजा चारा मिळण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, बार्ली, तसेच काही कडधान्ये उदा. चवळी,  मूग यांचेही चारा उत्पादन घेता येऊ शकते.
  • शहरी भागात कमी जागेमध्येही काही अत्यावश्यक भाज्या व पिकांचे उत्पादन घेण्यासाठी या पद्धती महत्त्वाच्या ठरतात. औषधी किंवा पोषक मानली जाणारे गव्हाचे तृणांकुर, विविध कडधान्यांचे तृणांकुर इ. निर्मितीसाठी हे तंत्र अधिक फायदेशीर आहे.
  • संपर्क-  डॉ. प्रल्हाद जायभाये - ७९८०६८४१८९ (कृषी हवामान शास्त्रज्ञ व प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,  परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

    Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

    Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

    Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

    Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

    SCROLL FOR NEXT