Market Bulletin: कापूस दरात सुधारणाकापूस भावात कालच्या तुलनेत आज काहिशी वाढ झाली आहे. आज बाजार समित्यांमधील लिलाव बंद होते. पण काही बाजारांमध्ये कापसाची आवक होऊन लिलाव पार पडले. या बाजारांमध्ये कापसाच्या भावात आज २०० ते ३०० रुपयांची सुधारणा दिसून आली. कापसाचा भाव आज ८ हजार २०० ते ८ हजार ७०० रुपयाने कापसाचे व्यवहार झाले. पुढे रुईचेही भाव वाढले आहेत. आज सीसीआयचा लिलावही बंद होता. सीसीआय देखील कापसाचा भाव वाढविण्याची शक्यता आहे. यामुळे कापूस भावाला चांगला आधार राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीन स्थिरसोयाबीनचे भाव आज स्थिरावले होते. आज बहुतांशी मोठ्या बाजारांमधील लिलाव बंद होते. काही बाजारांमध्ये लिलाव पार पडले. पण या लिलावांमध्ये सोयाबीनच्या भावात कालच्या तुलनेत फारसा फरक दिसून आला नाही. आजही बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनला सध्या चांगला उठाव आहे. तर दुसरीकडे बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे. यामुळे सोयाबीनचा भाव टिकून राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Banana Market: खानदेशात केळी आवकेत वाढ.गवार तेजीतराज्यातील बाजारात गवारचा भाव टिकून आहे. गवारची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून स्थिरावली आहे. गवारला मागील वर्षभर कमी आवकेमुळे चांगला भाव मिळत आहे. सध्या अनेक भागात गवारची लागवड कमी असल्याचे दिसते. त्यामुळे आवक कमी आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल ५ हजार ते ७ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गवारची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवारचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत. .Watermelon Prices Drop: अकोल्यात कलिंगडांच्या दरात ६०० रुपयांपर्यंत घसरण.गव्हाची आवक वाढलीदेशातील बाजारात सध्या गव्हाची आवक वाढली आहे. याचा दरावर परिणाम दिसून येत आहे. यंदा देशात गव्हाची लागवड वाढली होती. तर गहू पिकासाठी पोषक हवामानही होते. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २२०० ते २६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाची काढणी देशभरात सुरु झालेली आहे. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे गहू बाजारावरील दबावही कायम राहील, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .डाळिंब तेजीतराज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव तेजीतच आहेत. बाजारातील डाळिंबाची आवक कमीच आहे. त्यातच गुणवत्तापूर्ण डाळिंबाची बाजारात टंचाई भासत आहे. याचा आधार दराला मिळत आहे. डाळिंबाचे भाव यामुळे सुधारले आहेत. सध्या डाळिंब बाजारात ८ हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकले जात आहे. रमजान महिन्यामुळे डाळिंबाला चांगला उठाव आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव पुढील काही दिवस पुन्हा टिकून राहू शकतात, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.