kokam 
ॲग्रो गाईड

मळमळ, पित्तावर आमसूल फायदेशीर

आमसूल महिलावर्गामध्ये अधिक लोकप्रिय आहे. नेहमीच्या जेवणामध्ये थोडा आंबटपणा येण्यासाठी आमसूल वापरले जाते.आमसुलामध्ये विविध औषधी गुणधर्म असून दैनंदिन आहारात याचा वापर फायदेशीर ठरतो.

विनीता कुलकर्णी

आमसूल महिलावर्गामध्ये अधिक लोकप्रिय आहे. नेहमीच्या जेवणामध्ये थोडा आंबटपणा येण्यासाठी आमसूल वापरले जाते. आमसूलची चटणीदेखील केली जाते. आमसुलामध्ये विविध औषधी गुणधर्म असून दैनंदिन आहारात याचा वापर फायदेशीर ठरतो.

  • पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातील गार वाऱ्यामुळे अंगाला खाज येऊन गांध्या उठतात. त्याला पित्त उठणे असे म्हटले जाते. अशावेळी ४-५ आमसुले पाण्यात भिजत घालावीत. भिजल्यानंतर ती कुसकरून गाळून ते पाणी त्वचेवर चोळावे. खाज कमी येते. तसेच आमसुले रात्री भिजत घालून सकाळी त्यात खडीसाखर घालून सेवन केल्यास उपयोग होतो.
  • कोकम तेल मेडिकलमध्ये उपलब्ध असते. हे तेल पायाच्या भेगांना लावल्यास मऊपणा येतो. हे तेल कोमट स्वरूपात लावावे.
  • काही जणांना सतत पित्ताचा त्रास होतो. पित्ताच्या उलट्या, मळमळ या तक्रारी वारंवार उद्‌भवतात. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधांचे नियमित सेवन करावे. आहारात आमटीमध्ये चिंचेऐवजी आमसुलाचा वापर केल्यास नक्कीच फायदा होतो.
  • कोकम (आमसूल) पित्तशामक असते. त्यामुळे उन्हाळ्यात पित्त कमी होण्यासाठी कोकमचे सरबत जरूर सेवन करावे.
  • बऱ्याचदा पित्तामुळे तोंडाची चव जाते. अजीर्ण होते. अशावेळी आमसुलाचे सार औषध म्हणून उत्तम काम करते. सार बनवण्यासाठी उकळत्या पाण्यात दोन आमसुले घालून झाकून ठेवावे. १५ मिनिटांनंतर त्या पाण्यात आमसूल कोळून गाळून घ्यावे. त्यात मीठ, साखर आणि तूप, जिरे, हिंगाची फोडणी घालून सार बनवावे. अजीर्ण आणि पित्तावर हे सार गुणकारी असते.
  • काही वेळेस पोटात गॅस होऊन जडपणा येतो. यासाठी आमसुले, जिरे, साखर घालून चटणी करावी. जेवणामध्ये या चटणीचा वापर करावा. पचन चांगले होण्यास मदत होते.
  • पथ्य 

  • शिळे, वातूळ, जास्त तेलकट, तुपकट पदार्थ, लोणचे, ठेचा, मिरचीचे लोणचे यांचे सेवन कमी करावे.
  • अवेळी जेवण, शिळे अन्न खाणे टाळावे.
  • काळजी

  • त्वचेवर खूप खाज येऊन वारंवार त्रास होत असल्यास, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधे घ्यावीत.
  • भूक न लागणे, मळमळणे, अशक्तपणा, पोट दुखणे, लघवीचा रंग बदलणे असा त्रास वारंवार होत असल्यास योग्य त्या तपासण्या जरूर कराव्यात.
  • दैनंदिन आहारात आमसुले वापरल्यास औषध म्हणून उत्तम काम करते.
  • संपर्क- डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

    Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

    Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

    Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

    Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

    SCROLL FOR NEXT