cultivation practices of green gram and black gram 
ॲग्रो गाईड

मूग आणि उडीदाची सुधारीत पध्दतीने लागवड

जमिनीत वापसा येताच जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात (१५ जून ते ३० जून) पेरणी करावी. उशिरा पेरलेल्या पिकाच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फुले, शेंगा कमी प्रमाणात लागतात.

​डॉ. चांगदेव वायळ, डॉ. नंदकुमार कुटे व डॉ. विश्‍वास चव्हाण

जमिनीत वापसा येताच जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात (१५ जून ते ३० जून) पेरणी करावी. उशिरा पेरलेल्या पिकाच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फुले, शेंगा कमी प्रमाणात लागतात. मुग आणि उडीद ही दोन्ही पिके मध्यम ते भारी जमिनीत घेतली जात असल्यामुळे खोलवर नांगरट करुन जमिन भुसभूशीत करणे आवश्यक असते. या पिकांच्या अधिक उत्पादनासाठी चांगली पूर्वमशागत करणे आवश्‍यक आहे. जमिनीची नांगरणी करून चांगली तापू द्यावी. मृगाचा पहिला मोठा पाऊस पडल्यानंतर वखराची पाळी द्यावी. शेतातील काडी, कचरा, धसकटे वेचून घ्यावीत. कुळवाच्या एक ते दोन पाळ्या द्याव्यात. जमिन व हवामान 

  • मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन लागवडीस योग्य असते. लागवड क्षारयुक्त, खोलगट, पाणी साचून राहणाऱ्या, चोपण, पाणथळ किंवा अत्यंत हलक्या जमिनीत करणे टाळावे.
  • पिकांस २१ ते २५ अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते.
  • सुधारीत वाण

    वाण पीक कालावधी उत्पन्न (क्वि./हेक्टर)
    मूग
    वैभव ७० ते ७५ १४ ते १५
    बी.पी.एम.आर.१४५ ६५ ते ७० १२ ते १४
    पी.के.व्ही. ए.के.एम.४ ६५ ते ७० १२ ते १५
    बी.एम.२००३-२ ६५ ते ७० १२ ते १४
    उत्कर्षा ६५ ते ७० १२ ते १४
    उडीद
    टी.ए.यु-१ ६५ ते ७० १० ते १२
    बी.डी.यु-१ ७० ते ७५ १० ते १२
    पी.के.व्ही. ब्लॅक गोल्ड १० ते १२ १० ते १२

    बियाणे हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.

    बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणांस ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति किलो बियाणांस चवळी गटाचे २५ ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. पेरणीची वेळ 

  •  जमिनीत वापसा येताच जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात (१५ जून ते ३० जून) पेरणी करावी.
  • उशिरा पेरलेल्या पिकाच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फुले, शेंगा कमी प्रमाणात लागतात.
  • पेरणीची पद्धत दोन ओळीत ३० सेंमी आणि दोन रोपांत १० सेंमी अंतर ठेवून पाभारीने पेरणी करावी. आंतरपिक पद्धती

  • मुग किंवा उडीदाच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची लावावी. याप्रमाणे आंतररीक घेतल्यास तुरीच्या जोमदार वाढीची सुरुवात होण्यापुर्वी मूग किंवा उडीदाचे पीक काढणीस येते.
  • तसेच मूग + ज्वारी (२ः१), कापूस + मूग (२ः१) इत्यादी आंतरपीक पध्दतीचाही अवलंब करता येतो.
  • खत व्यवस्थापन

  • शेवटच्या कुळवणीच्या वेळी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत पसरुन द्यावे.
  • पेरणीवेळी हेक्टरी २० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि पालाश ३० किलो द्यावे. सर्व खते पेरणीच्या वेळी एकदाच द्यावीत.
  • पाणी व्यवस्थापन मूग आणि उडीद ही दोन्ही पिके पावसाच्या पाण्यावर येणारी पिके आहेत. या पिकांना फुले येण्याच्या वेळी व शेंगा भरण्याच्या कालावधीत हलके पाणी द्यावे. तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास फायदेशीर ठरते. आंतरमशागत पिकाच्या जोमदार वाढीसाठी पीक तणविरहीत ठेवावे. पीक २० ते २५ दिवसांचे असतांना पहिली आणि ३० ते ३५ दिवसांचे असतांना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणीनंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी.

    कीड व रोग नियंत्रण - (फवारणी प्रमाण प्रतिलिटर पाणी) केसाळ अळी

  • प्रादुर्भावग्रस्त झाड उपटून त्यावरील अळ्या नष्ट कराव्यात.
  • क्लोरपायरीफाॅस (२० इसी) २ मिलि
  • भूरी विषाणू पाण्यात मिसळणारे गंधक २.५ ग्रॅम

    पांढरी माशी ५ टक्के निंबाेळी अर्क किंवा अझाडिरेक्टीन (३० पीपीएम) ५ मिलि

    शेंगा पोखरणारी कीड

  • क्लोरएन्ट्रानिलिप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.२ मिलि किंवा
  • प्ल्युबेंनडायमाईड (३९.३५ टक्के प्रवाही) ०.२ मिलि
  • संपर्क - डॉ. चांगदेव वायळ, ९९७५५४१९६७ (कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Dairy Farming: आदर्श गोठा पुरस्काराचा राज्यभरात आदर्श घ्यावा; पालकमंत्री आबिटकर

    Water Allocation: हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात

    Agrowon Podcast: आले दरात सुधारणा; जिऱ्याचे भाव टिकून, कांद्यात काहीसे चढ उतार, गव्हाचे दर स्थिर, पपईची आवक कमीच

    Agriculture Scheme: नांगर, रोटाव्हेटरसह १२ अवजारांसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान; यांत्रिकीकरणाला सरकारकडून प्रोत्साहन

    Brinjal Farming: दर्जेदार उत्पादनासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन

    SCROLL FOR NEXT