भाजीपाला पिकावरील रोगव्यवस्थापन महत्त्वाचे आहे.  
 सद्यस्थितीत भाजीपाला पिकातील कीड- रोग नियंत्रण, पाणीव्यवस्थापन या बाबी महत्त्वाच्या आहेत. साठवणुकीच्या धान्याची योग्यपद्धतीने साठवणूक ही बाबही महत्वाची आहे.  
 साठवणीचे धान्य    साठवणीच्या धान्यातील ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्यास साठवणीमध्ये किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी साठवणीपूर्वी धान्य उन्हात चांगले वाळवावे. धान्यातील ओलावा १० टक्क्यांपेक्षा कमी राहील याची काळजी घ्यावी.
 ऊस    उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता जाणवते. अशा वेळी पिकामध्ये पाचट आच्छादनाचा वापर करावा. पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पीकपाण्याचा ताण सहन करेल. पाण्याची कमतरता असल्यास, ठिबक सिंचन फायदेशीर ठरते. त्यातही पाणी कमी पडल्यास, पिकाच्या वाढीनुसार एक दिवसाआड दोन तास संच चालवावा. प्रवाही पद्धतीने पाणी देत असल्यास एक सरी आड पाणी द्यावे. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्यांनी उन्हाळ्यात ८-९ दिवसांच्या अंतराने  ८ सें.मी. खोलीपर्यंत पाणी द्यावे.
 पानवेल    मुळांवर गाठी करणाऱ्या सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी ८०० किलो निंबोळी पेंड प्रतिएकरी जमिनीत मिसळून हलके पाणी द्यावे. त्यानंतर एक महिन्याने ८ किलो ट्रायकोडर्मा प्लस प्रतिएकरी १०० किलो शेणखतातून झाडाभोवती मातीत मिसळून हलके पाणी द्यावे.
 लसून घास    हिरवी अळीच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी   एसएलएनपीव्ही १ मि.लि. अधिक बिव्हेरिया बॅसिअाना ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी.
    लिंबूवर्गीय पिके    सिट्रस सायला या रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी क्विनाॅलफाॅस (२५ टक्के प्रवाही) १ मि.लि. किंवा नोव्हॅलुराॅन (१० टक्के प्रवाही) ०.५५ मि.लि.  
 सूर्यफूल    केसाळ अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.    नियंत्रण : 
 संपर्क :  ०२४२६- २४३२३९    (कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)