Rose intercrop in Teak 
ॲग्रो गाईड

व्यवस्थापन साग लागवडीचे

सामान्यपणे सागाची छाटणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षापासून मार्च ते जून महिन्यांमध्ये केली जाते. रोपांची अवेळी किंवा तांत्रिकदृष्ट्या अयोग्य छाटणी केल्यास गाठीयुक्त आणि दुय्यम दर्जाची वाढ होते. हे लक्षात घेऊन साग लागवडीचे योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे.

संग्राम चव्हाण, विजयसिंह काकडे

सामान्यपणे सागाची छाटणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षापासून मार्च ते जून महिन्यांमध्ये केली जाते. रोपांची अवेळी किंवा  तांत्रिकदृष्ट्या अयोग्य छाटणी केल्यास  गाठीयुक्त आणि दुय्यम दर्जाची वाढ होते. हे लक्षात घेऊन साग लागवडीचे योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे.

सागवानाच्या लागवडीमध्ये साधारणतः ३ ते ४ महिन्याच्या अंतराने खुरपणी केल्याने रोपाच्या खोडाजवळ मुळांसाठी हवा खेळती राहते. जमीन तणमुक्त ठेवण्यास मदत होते. खुरपणी करून काढलेल्या तणाचे  झाडांच्या आळ्यामध्ये आच्छादन करावे. साग वनशेतीमध्ये छाटणी आणि विरळणी केल्याशिवाय योग्य गुणवत्तेचे आणि दर्जेदार लाकूड मिळत नाही.  छाटणी तंत्र     सामान्यपणे सागाची छाटणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षापासून मार्च ते जून महिन्यांमध्ये केली जाते. रोपांची उंची ३ ते ४ मीटर झाल्यानंतर साधारणत: सुकलेल्या, रोगट आणि खालच्या फांद्या तीक्ष्ण हत्याराने प्रमुख खोडापासून ५ ते ७ सें. मी. वर छाटाव्यात. ही छाटणी प्रक्रिया झाडाची उंची ६ ते ७ मीटर झाल्यावर परत एकदा करावी.  छाटलेल्या ठिकाणी बोर्डो मिश्रण लावावे. जेणे करून रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. छाटणीमुळे गाठमुक्त आणि उच्च गुणवत्तेचे इमारतीचे लाकूड मिळण्यास मदत होते. रोपांची अवेळी किंवा तांत्रिकदृष्ट्या अयोग्य छाटणी केल्यास  गाठीयुक्त आणि दुय्यम दर्जाची वाढ होते.  विरळणीचे तंत्र  

  • विरळणीचा मुख्य उद्देश म्हणजे वृक्षांच्या दर्जेदार वाढीसाठी सूर्यप्रकाश, पर्याप्त जागा, पाणी आणि पोषकद्रव्ये उपलब्ध करणे हा आहे. यासाठी प्रामुख्याने रोगग्रस्त तसेच अत्यंत कमी वाढ होणाऱ्या रोपांची संख्या कमी करावी. 
  • लागवड जेव्हा सघन पद्धतीने २ × २ मीटर  किंवा ३ × ३ मीटर अंतरावर केलेली असते, तेव्हा ५ ते ७ व्या वर्षी एक झाड सोडून दुसऱ्या झाडाची काढणी करावी. त्यानंतर दुसऱ्यावेळी म्हणजेच १० ते ११ वर्षी पुन्हा विरळणी करावी. 
  • विरळणीमुळे लागवडीमध्ये शिल्लक राहिलेल्या झाडांच्या वाढीस पोषक वातावरणनिर्मिती होते. विरळणीमुळे सुरुवातीच्या काळामध्ये काढलेल्या झाडांपासून काही प्रमाणात पैसा मिळतो. दोन ओळींमधील अंतर जर चार मीटर पेक्षा जास्त असेल तर वनशेतीमध्ये विरळणीची गरज नाही. 
  • उत्पादन आणि काढणी चक्र  

  • साग लागवडीमध्ये सरळ, उंच वाढलेले, गाठमुक्त, दंडगोलाकार खोड, जास्त घनता, ज्यांचा घेर ४० सें.मी. पेक्षा जास्त आहे, अशा झाडांची कापणी केली जाते. केरळ वन संशोधन केंद्रातील संशोधनातून असे दिसून आले आहे, की जर वनशेतीमध्ये योग्य पाणी, खते, झाडांमधील अंतर, छाटणी व विरळीकरणाचे योग्य व्यवस्थापन केले असेल तर २० वर्षे वयाच्या झाडापासून ०.६० घनमीटर उपयुक्त लाकूड मिळते.
  • सागवानामध्ये लाकडाचा दर त्याच्या प्रतीनुसार ठरवितात. आजच्या परिस्थितीमध्ये  २० ते २५ वर्षांच्या झाडापासून साधारणतः १२ ते १५ घन फूट एवढे लाकूड मिळू शकते.
  • सागवानाच्या लाकडाला उच्च गुणांमुळे मागणी आहे. लाकडाची मजबुती, टिकाऊपणा, लाकडाच्या आकारातील स्थिरता, लाकडापासून फर्निचर बनवण्यासाठीची सरळता, लाकडावरील खिळ्यांना गंज न लागणे हे गुणधर्म लक्षात घेता सागवानाला बाजारात चांगली मागणी आहे.
  • सागवान लाकडाचा उपयोग मुख्यतः फर्निचर, प्लाय, जहाज बांधणी, मूर्तिकला, कोरीव काम, दरवाजे व खिडकी बनवण्यासाठी केला जातो.
  •   - संग्राम चव्हाण, ९८८९०३८८८७   (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि.पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

    Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

    Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

    Agriculture Mechanization : टिलरने वाढले शेतकऱ्यांचे बळ

    Agrowon Podcast: तुरीचा बाजार मंदीतच; हळदीला मर्यादीत उठाव, कांदा स्थिर, गवार तेजीत, तर कोबीची आवक कायम!

    SCROLL FOR NEXT