Drip Irrigation system 
ॲग्रो गाईड

ठिबक सिंचनातून खतांचा कार्यक्षम वापर

ठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी, जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म म्हणजे सामू, विद्युतवाहकता, क्षारांचे प्रमाण, जमिनीची जडण घडण आणि पोत यावर फर्टिगेशनची कार्यक्षमता अवलंबून असते.

डॉ.सुकेशनी वाणे

ठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी, जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म म्हणजे सामू, विद्युतवाहकता, क्षारांचे प्रमाण, जमिनीची जडण घडण आणि पोत यावर फर्टिगेशनची कार्यक्षमता अवलंबून असते.

पीक उत्पादनात वाढ आणि  पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचन फायदेशीर ठरते. पिकाची सर्वांगीण वाढ होण्यासाठी एकूण १७ अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. प्रत्येक अन्नद्रव्य आवश्यक असून प्रत्येकाचे कार्य वेगळे असल्यामुळे दुसरे अन्नद्रव्य त्याची उणीव भरून काढू शकत नाही. प्रत्येक वाढीच्या अवस्थेत वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. ही गरज विद्राव्ये खताच्या साहाय्याने पूर्ण करता येते. पिकाच्या उत्तम वाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्याची विभागणी मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये व हितकारक अन्नद्रव्ये चार प्रकारात केलेली आहे.  मुख्य अन्नद्रव्ये : कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद व पालाश  दुय्यम अन्नद्रव्ये : गंधक, कॅल्शिअम, मग्नेशिअम सूक्ष्म अन्नद्रव्ये : लोह, जस्त, तांबे, बोरॉन, मंगल, मॉलिब्डेनम, निकेल हितकारक अन्नद्रव्ये : सिलिकॉन, क्लोरिन, सोडियम व व्हॅनेडियम 

  • फर्टिगेशनमुळे पिकाला आवश्यक पाण्याची ३० ते ६० टक्क्यांपर्यंत बचत होते. खतांची उपयुक्तता जास्तीत जास्त मिळण्यासाठी ठिबक संचाद्वारे विद्राव्य खत द्यावे. ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीत खत  पिकाच्या अवस्थेनुसार व गरजेनुसार, देता येऊ शकते. ठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी, जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म म्हणजे सामू, विद्युतवाहकता, क्षारांचे प्रमाण, जमिनीची जडण घडण आणि पोत यावर फर्टिगेशनची कार्यक्षमता अवलंबून असते.
  • दररोज किंवा एक दिवसाआड खते देता येतात. 
  • गरजेनुसार खते दिल्यामुळे सर्व परिस्थितीत अचूक व सारख्या प्रमाणात वापर शक्य होतो. खतांची कार्यक्षमता वाढते. ओलाव्याच्या भागातच पिकांची कार्यक्षम मुळे असल्याने, अन्न द्रव्ये चांगल्यारीतीने पिकास उपलब्ध होतात. 
  • पाण्याची कार्यक्षमता ४० ते ५० टक्के व खतांची कार्यक्षमता २५ ते ३० टक्क्यांनी वाढते. 
  • पिकाच्या संवेदनक्षम अवस्थेनुसार आवश्यक तेवढी खताची मात्रा देता येते. 
  • पिकाच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन दर्जेदार व निर्यातक्षम उत्पन्न मिळते.
  • पीक लवकर तयार होते व उत्पादनात २० ते ४० टक्क्यांनी  वाढ होते. 
  • हलक्या व कमी प्रतीच्या जमिनीत पीक घेता येते.
  • खते देण्यासाठी लागणारा मजुरीवरील खर्च वाचतो. 
  • ठिबक सिंचनासाठी लागणारी खते
  • ही खते संपूर्णपणे पाण्यात विरघळणारी असावीत.आम्लधर्मी असावीत.
  • हाताळणी व वाहतूक सुलभ होण्यासाठी ही खते घन स्वरूपात उपलब्ध असावीत. क्लोराईड व सोडियम सारखे घटक नसावेत.
  • सूक्ष्म व दुय्यम मूलद्रव्ये उपलब्ध असावीत.  
  • फर्टिगेशन वापरताना

  •  ठिबक सिंचन पद्धती मधून द्यायचे पाण्याचे वेळापत्रक. 
  • जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण व पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रातील खतांची तीव्रता.
  •  ठिबक सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता 
  •   जमिनीचे तापमान व पिकाच्या वाढीची अवस्था. 
  •   पिकाला खतांची मात्रा ठरविण्यापूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक. 
  •  जमिनीचा सामू, विद्युत वाहकता, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये, यांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार विद्राव्य खताची मात्रा ठरवावी. 
  • विद्राव्य खताचा वापर करताना शिफारशी प्रमाणे सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक.निचऱ्याद्वारे होणाऱ्या अन्नद्रव्यांचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घ्यावी. 
  •  गरजेपेक्षा जास्त खत देणे टाळावे. 
  •  खतापासून निर्माण होणाऱ्या अडथळ्यामुळे तोट्या बंद पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. नळ्या व पाइप्स नरम पडणार नाहीत याची काळजी घ्यावे. 
  • खते १०० टक्के पाण्यात विरघळणारी असावीत. तसेच पाण्याच्या क्षाराबरोबर खतांची रासायनिक अभिक्रिया होणार नाही अशाप्रकारे क्षारयुक्त पाण्याचा वापर करावा. 
  • खते देण्याआधी आणि दिल्यानंतर कमीत कमी अर्धा तास संचाद्वारे पाणी द्यावे, त्यामुळे समप्रमाणात पाणी दिले जाते. संच खराब होत नाही.  
  • -  डॉ.सुकेशनी वाणे, ९४२३४७३६२९ (कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maize Varieties: एल निनोच्या परिस्थितीशी सामना करु शकणारे मक्याचे वाण

    Farmer Issues: सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी : हर्षवर्धन सपकाळ

    Yeola Rain Damage: येवल्यात वादळी वाऱ्यासह पावसाने दाणादाण

    Nashik Onion Farmer Crisis: कांद्याला कवडीमोल भाव, नाशिकमधील शेतकऱ्याचा बळी घेतला, राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया

    Illegal Tree Cutting: सातारा- लोणंद मार्गावर बेकायदा वृक्षतोड अन् वाहतूक

    SCROLL FOR NEXT