अॅस्टर 
ॲग्रो गाईड

अशी करा ॲस्टर लागवड

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे

ॲस्टर लागवडीचे नियोजन करताना हंगाम, जातींची निवड, क्षेत्र, पाण्याची उपलब्धता या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा.

  • लागवड करताना सगळे क्षेत्र एकाच वेळी न लावता तीन अगर चार टप्प्यांत लावावे, म्हणजे फुले अधिक काळ बाजारात पाठविता येतील. मध्यम, उत्तम पाण्याचा निचरा होणारी आणि सेंद्रिय खतयुक्त जमीन या फुलपिकास आवश्‍यक असते.
  • वरकस, हलक्‍या जमिनी, तसेच चुनखडीयुक्त जमिनीत याची लागवड करू नये. जमिनीची मशागत करून हेक्‍टरी १२ टन शेणखत मिसळून घ्यावे. लागवडीपूर्वी हेक्‍टरी ५० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. रासायनिक खतांची मात्रा माती परीक्षणानुसार द्यावी. यानंतर ६० सें.मी. अंतरावर सरी- वरंबे तयार करावेत.
  • लागवड ६० x ३० सें.मी. किंवा ४५ x ३० सें.मी., ४५ x ४५ सें.मी.  अंतरावर करतात. लागवड करताना वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी.
  • जाती ः

  • फुले गणेश व्हाइट ः ही जात लांब दांड्याची फुले मिळण्यासाठी उपयुक्त असून, फुले शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात. हंगाम चार ते पाच महिन्यांचा असतो. फुलांचे चांगले उत्पादन मिळते. फुलदाणीमध्ये जास्त काळ फुले टिकतात.
  • फुले गणेश पिंक ः फुलावर लवकर येणारी जात असून, निमपसरी, आकर्षक गुलाबी रंगाची फुले मिळतात. हंगाम चार ते पाच महिने असतो.
  • फुले गणेश व्हायलेट ः ही जात निमपसरी, फुलावर लवकर येणारी आणि गडद जांभळ्या रंगाची फुले मिळतात. हंगाम चार ते पाच महिने असतो.
  • गणेश पर्पल ः फुले फिक्कट जांभळ्या रंगाची असतात. फुलांचे चांगले उत्पादन मिळते.
  • - ०२० - २५६९३७५० राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड, पुणे

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Jackfruit Farming: संत्रा पट्ट्यात फणसाचा प्रयोग

    Agriculture Crisis: शेतीला गरज सर्वंकष पुनर्रचनेची!

    Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

    Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

    Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

    SCROLL FOR NEXT