सागावरील पाने खाणाऱ्या व चाळणी कऱणाऱ्या अळीचे नियंत्रण
सागावरील पाने खाणाऱ्या व चाळणी कऱणाऱ्या अळीचे नियंत्रण 
ॲग्रो गाईड

सागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

डॉ. प्रमोद मगर, डॉ. सुरेश नेमाडे, मयूर ढोले

सागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी करणारी अळी या प्रमुख किडी आहेत. या किडींचा प्रादुर्भाव रोपवाटिका, लागवडीतील साग किंवा जंगलातील झाडांवरही आढळतो. दरवर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यांत पावसानंतर सागाच्या झाडाला फुटलेल्या नवीन पालवीवर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होताना दिसतो. त्यानंतर पावसाळा कमी होताना साग झाडावरील पाने जुनी होत असताना पानांची चाळणी करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढू लागतो. या दोन्ही किडींचा जीवनक्रम कमी दिवसांचा असून, कमी काळात हा प्रादुर्भाव वाढू शकतो.

 पाने खाणारी अळी (इंग्रजी नाव - Teak Defoliator, शा. नाव - Hyblaea puera)

  • ओळख ः अळी हिरवी, करड्या रंगाची असून, शरीराच्या वरील भागावर लालसर पट्टा असतो. शरीरावर काळसर किंवा धूरसर उभ्या रेषा असतात. पतंगाच्या पुढील पंखांची जोडी लालसर तपकिरी रंगाची, तर मागील पंखांची जोडी काळसर गडद तपकिरी रंगाची असते. त्यावर नारंगी रंगाचे मोठे पट्टे असतात.
  • प्रादुर्भावाचा प्रकार व लक्षणे ः ही अळी पावसाळ्याच्या सुरवातीला येणाऱ्या सागाच्या कोवळ्या पानांवर उपजीविका करते. अळी संपूर्ण पान खाऊन टाकते. फक्त शिराच शिल्लक राहतात.
  •   पानांची चाळणी करणारी अळी (इंग्रजी नाव - Teak Skeletonizer, शा. नाव - Paliga machoeralis)

  • ओळख ः अळी हिरवी, पांढऱ्या रंगाची असून, डोके भुरकट तपकिरी रंगाचे असते. पतंगाच्या समोरील पंखांवर आडव्या रेषा असतात, तर मागील पंखांच्या जोडीवर मोठे पट्टे असतात.   
  • प्रादुर्भावाचा प्रकार व लक्षणे ः अळी पावसाळ्याच्या शेवटच्या काळात जुन्या पानांवर उपजीविका करते. मोठ्या पट्ट्यात सागाची पाने जाळीदार खाल्लेली दिसतात. कालांतराने झाडावरची पाने खाली जमिनीवर गळून पडतात. अधिक पानझड झाल्यास झाडाच्या फांद्यासुद्धा वाळतात. मिश्र जंगलापेक्षा शुद्ध सागवनाचे या किडीमुळे जास्त नुकसान होते. अधिक प्रादुर्भावाच्या स्थितीत पाने वाळून तपकिरी रंगाचा सागवानाचा पट्टा दिसतो.
  • व्यवस्थापन -

  • रोपवाटिकेतील प्रादुर्भावग्रस्त झाडांची पाने तोडून किंवा गळालेली पाने गोळा करून अळीसह नष्ट करावीत.
  • रोपवाटिकेमध्ये प्रादुर्भाव आढळल्यास निंबोळी अर्क ५% किंवा कडुनिंब आधारित कीडनाशक - अॅझाडिरेक्टीन (१००० पीपीएम) ५ मि.लि. प्रतिलिटर प्रमाणेची फवारणी करावी.  किडींचा प्रादुर्भाव कमी राखण्यासाठी मिश्र झाडांची लागवड करावी. अळ्यांचे पतंग आकर्षित करून नष्ट करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
  • वरील दोन्ही अळ्यांच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता बॅसिलस थुरिंजिएन्सिस कुरस्तकी (Bacillus thuringiensis var. kurstaki) या कीटकनाशकाची (०.२५% द्रावण) २.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  •  संपर्क : डॉ. प्रमोद मगर, ७७५७०८१८८५           : डॉ. सुरेश नेमाडे, ७९७२२२३२७०          (कृषिविज्ञान केंद्र, यवतमाळ)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT