द्राक्ष पानातील लोह कमतरता, तुलनेसाठी उजवीकडे आरोग्यपूर्ण पान
द्राक्ष पानातील लोह कमतरता, तुलनेसाठी उजवीकडे आरोग्यपूर्ण पान 
ॲग्रो गाईड

अधिक पाण्यामुळे द्राक्ष घडनिर्मितीवर होईल विपरीत परिणाम

डॉ. आर. जी. सोमकुंवर

द्राक्ष वेलीपासून चांगल्या प्रतीच्या उत्पादनामध्ये वाढ मिळविण्यासाठी वाढीच्या ठराविक अवस्थेमध्ये संतुलित पाणी देणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये विशिष्ट वाढीच्या अवस्थेमध्ये गरजेपेक्षा एकतर कमी किंवा अधिक पाणी मिळते. पाणी कमी झाले तरी वेलीवर अनिष्ट परिणाम होतात. पाणी जास्त झाले तरीसुद्धा वेलीच्या व घडाच्या विकासावर अनिष्ट परिणाम होतात. जास्त पाण्याचे जमिनीवरील दुष्परिणाम :

  • आपल्याकडे हलक्या व भारी अशा प्रकारच्या दोन जमिनी आहेत. त्यातील भारी जमिनीमध्ये जास्त पाणी झाल्यास जमिनीतील मातीच्या कणांचे प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीत पाणी जास्त प्रमाणात व जास्त काळ धरून राहील. यामुळे मुळींचा विकास थांबेल. मुळी काळी पडेल व कार्य करणे थांबेल. याच जमिनीमध्ये जास्त पाणी असलेल्या परिस्थितीमध्ये जास्त तापमान असताना बाष्पोत्सोर्जन वाढेल. जमिनीतील अन्नद्रव्येही पाण्यासोबत उचलली जातील, अशा वेळी वेलीच्या वाढीचा जोम वाढेल. या तुलनेमध्ये कमी तापमानामध्ये वेलीवर फारसे परिणाम दिसणार नाहीत.
  • हलकी जमिनीमध्ये पाण्याचे वहन सरळ असल्यामुळे मुळांच्या परिसरात पाणी धरून राहणार नाही. या जमिनीत पाणी धरून ठरवण्याची क्षमता असल्यामुळे पाणी मुळाच्या कक्षेच्या बाहेर जाईल. त्यामुळे अशा जमिनीत वेलीच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता कमी असेल.
  • जास्त पाणी झालेल्या परिस्थितीत व खोलपर्यंत पाणी गेलेल्या अवस्थेमध्ये अन्नद्रव्यांच्या व हानिकारक आयन्स यांचे लिचिंग झाल्यामुळे भूजलाचे प्रदूषणाची शक्यता वाढेल.
  •  द्राक्ष वेलीवरील परिणाम : ज्या परिस्थितीत वेल पाणी जास्त उचलून घेईल, अशा वेळी वेलीच्या वाढीचा जोम जास्त असेल. ही परिस्थिती घड निर्मितीच्या कालावधीमध्ये आल्यास घड निर्मितीवर विपरीत परिणाम होईल. वेलीमध्ये गर्भधारणा होण्याचे प्रमाण कमी होईल. जास्त पाण्यामुळे मुळांची कार्य करण्याची क्षमता कमी होते. परिणामी अन्नद्रव्ये उचलण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे मण्यांचा आकार कमी राहील. या सर्व गोष्टींचा उत्पादनात घट येईल. मुळाच्या कक्षेतील अन्नद्रव्ये वाहून गेल्यामुळे महत्त्वाच्या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येईल. (उदा. क्लोरोसिस, फेरस कमतरता, पाने पिवळी पडणे, नत्राची कमतरता इ.) त्यामुळे वेलीची अन्नद्रव्याची गरज व उपलब्धता यामधील समतोल बिघडेल. उत्पादनात घट येईल. संपर्क : डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

    Govind Hande : अविरत कर्मयोगी

    Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

    Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

    Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

    SCROLL FOR NEXT