कोळसा निर्मितीसाठी वापरली जाणारी यंत्रणा  
ॲग्रो गाईड

तंत्र कोळसा उत्पादनाचे...

डॉ. वैभवकुमार शिंदे

कार्बनच्या प्रमाणावर कोळशाचे औष्णिक मूल्य ठरते. कार्बनायझेशनसाठी सर्वसाधारणपणे वापरले जाणारे तापमान आणि त्यातून मिळणारे औष्णिक मूल्य याची माहिती असणे आवश्यक आहे. इंधन, रसायन आणि वायूचे शुद्धीकरण करण्यासाठी कोळशाचा प्रामुख्याने वापर केला जातो. प्रगतिशील देशांमध्ये घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी अजूनही कोळशाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने कार्बन असतो. हा उष्ण रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केला जातो. या प्रक्रियेमध्ये, जैवभारामधील पाण्याचे प्रमाण कमी केले जाते. त्यामुळे उत्पादनातील कार्बनचे प्रमाण वाढते. यास  कार्बनायझेशन असे म्हणतात. कार्बनायझेशन मध्ये हवेचा प्रतिबंधितीत प्रवाह सोडून लाकूड तापवले जाते.

अशी होते प्रक्रिया :

  • सर्वसाधारणपणे  तापमान १७० ते ५०० अंश सेल्सिअस कार्बनायझेशन मध्ये घडून येते. हे घडवून आणण्यासाठी किल्न या यंत्रणेचा वापर केला जातो. कार्बनायझेशन प्रक्रियेमध्ये सर्व  वायूरूपात जाणाऱ्या घटकाचे वायूमध्ये रूपांतरण होते आणि ते लाकडातून बाहेर पडतात. यामध्ये कार्बन मोनॉक्साइड आणि कार्बन डायॉक्साईड हे वायू असतात. याचबरोबरीने यामध्ये मिथेनॉल, आम्ल, हलके टार वगैरे हे घनरुपामध्ये वेगळे होतात.
  • कार्बनायझेशनमध्ये घडणारी प्रक्रिया : C6 (H2O) 5n  --- (उष्णता देणे, प्रतिबंधित हवा)  --- 6n C + 5n H2O
  • कोळशाची गुणवत्ता ही त्याला दिल्या जाणाऱ्या तापमानावर अवलंबून असते. त्यात असलेल्या कार्बनच्या प्रमाणावर कोळशाची गुणवत्ता ठरते.
  • जो कोळसा २०० अंश सेल्सिअस तापमानात तयार करतात, त्यामध्ये ५० टक्के कार्बन असतो. जो कोळसा ६०० अंश  सेल्सिअस तापमानात तयार करतात, त्यात ८८ टक्क्यांपर्यंत कार्बन असतो.
  • कार्बनच्या प्रमाणावर कोळश्याचे औष्णिक मूल्य सुद्धा ठरते. कार्बनायझेशनसाठी सर्वसाधारणपणे वापरले जाणारे तापमान आणि त्यातून मिळणारे औष्णिक मूल्य याची माहिती असणे आवश्यक आहे.
  • कोळशाचा वापर :

  • इंधन म्हणून वापर.
  • साखर उद्योगात रंग प्रतिबंधक घटक.
  • रसायन आणि वायुचे शुद्धीकरण करण्यासाठी
  • रासायनिक प्रक्रियांमध्ये मध्यस्त घटक.
  • कार्बनायझेशनसाठी वापरले जाणारे तापमान आणि त्यातून मिळणारे औष्णिक मूल्य

    तापमान (अंश सेल्सिअस)     कार्बन (टक्के)   औष्णिक मूल्य (MJ- kg)
    ३००     ३०     २३
    ४००    ७०    ३०
    ६००    ८८    ३३
         
    कोळसा आणि त्यातील घटक घटक     प्रमाण (टक्के)
    व्होलाटाईल     २० ते ३०
    स्थीर कार्बन    ७८ ते ९०
    राख     १.५ ते ५
    ओलावा   ५ ते ८
    घनता     १३० किलो प्रति घन मीटर

    संपर्क : डॉ. वैभवकुमार शिंदे, ९९६०९७५२७१ (कृषी अभियांत्रिकी विभाग,महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Monsoon Delay Impact: मॉन्सूनच्या पावसाअभावी उन्हाचा चटका तापदायक

    Sesame Auction: सेलू उपबाजारात दर शनिवारी होणार तिळाचे लिलाव

    Agri Department Tranfers Delay: आकृतिबंधाच्या आडून बदल्यांना खो; पात्रता, निकडीची कारणे असूनही कृषी विभागाकडून अडवणूक

    Hormuz Strait Crisis: ‘हालचाली थांबवा, अन्यथा कारवाई’; इराणी नौदलाचा व्यापारी जहाजांना इशारा

    Global Agriculture Trade: अन्नधान्य उत्पादन विक्रमी; पण पुरवठ्याची कासवगती, होर्मुझ तणावामुळे वाहतूक महागली

    SCROLL FOR NEXT