Solapur Water Stock : सात मध्‍यम प्रकल्पांत ८० टक्के पाणीसाठा

Ujani Dam Storage : सात मध्‍यम प्रकल्पात ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. ५६ लघू प्रकल्पापैकी ७ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तरी अद्याप २५ प्रकल्पांतील पाणीसाठा शून्यावरच आहे. उर्वरित प्रकल्पात २० ते ४० टक्के पाणीसाठा आहे.
Ujani Dam
Ujani DamAgrowon
Published on
Updated on

Solapur News : जिल्ह्यात जून व जुलै महिन्यामध्‍ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, पण ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे तर उजनी धरण १०० टक्के भरले आहे.

सात मध्‍यम प्रकल्पात ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. ५६ लघू प्रकल्पापैकी ७ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तरी अद्याप २५ प्रकल्पांतील पाणीसाठा शून्यावरच आहे. उर्वरित प्रकल्पात २० ते ४० टक्के पाणीसाठा आहे. लघू प्रकल्प भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

Ujani Dam
Maharashtra Water Storage: राज्यात यंदा आठ टक्के अधिक पाणीसाठा

मे महिन्यात झालेल्या दमदार पावसाने कोरड्या पडलेल्या बहुतांश मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ झाली. पण जून व जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झालीच नाही.

ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाल्याने मध्यम प्रकल्पातील साठ्यात ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. जवळगाव, मांगी व आष्टी प्रकल्प वगळता एक प्रकल्प १०० टक्के तर इतर तीन प्रकल्प ९० टक्केच्या वर गेले आहेत.

Ujani Dam
Marathwada Water Storage : मराठवाड्यातील पाणीसाठे ६६.२३ टक्क्यांवर

लघू प्रकल्प : ५६ पैकी २५ प्रकल्प कोरडे

रामपूर, हणमगाव, बीबीदारफळ, बोरगाव, वैराग, कळंबवाडी, निमगाव हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. होटगी, भुरीकवठे, कोरेगाव, कारी काटेगाव, चारे व घोळसगाव या प्रकल्पात ५० ते ९० टक्के पाणीसाठा आहे. २५ हून अधिक प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

मध्यम प्रकल्प : ८० टक्के पाणीसाठा

एकरूख ८४.२७

हिंगणी पा. १००

जवळगाव ६०.७७

मांगी ६७.२२

आष्टी ६१.७६

बोरी ९३.०६

पिंपळगाव ढाळे ९७.५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com