कोबीवरील चौकोनी ठिपक्याच्या पतंगाची अळी
कोबीवरील चौकोनी ठिपक्याच्या पतंगाची अळी  
ॲग्रो गाईड

कोबीवर्गीय भाजीपाला पिकांवरील किडींचे नियंत्रण

मधुकर भालेकर, सोमनाथ पवार, चिमाजी बाचकर

कोबीवर्गीय भाजीपाला पिकावर सद्यस्थितीत काळी माशी, मावा, पाकोळी व चौकोनी ठिपक्यांचा पतंग आदी किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यांच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.

काळी माशी लक्षणे व नुकसान : माशी पानांच्या पेशीत अंडी घालते. अंड्यातून निघालेली काळ्या रंगाची अळी पाने खाते. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास पाने खाऊन फक्त शिरा शिल्लक राहतात. अळ्यांना स्पर्श केला किंवा झाड हलवले तर ताबडतोब खाली पडतात. नियंत्रण : अळ्या गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकाव्यात.

मावा लक्षणे व नुकसान : हिरव्या किंवा काळ्या रंगाचे मावा कोवळ्या पानातील अन्नरसाचे शोषण करतात. त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी होऊन पिवळी पडतात आणि वाळून जातात. मावा शरीरातून चिकट पदार्थ बाहेर टाकतात. हा पदार्थ पानावर साठून राहिल्याने पाने चिकट व तेलकट दिसतात. त्यानंतर या पदार्थावर काळी बुरशी वाढते. परिणामी, प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते. झाडांची वाढ खुंटून उत्पादनात घट येते. नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरॅक्‍टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि.  

चौकोनी ठिपक्‍यांचा पतंग (पाकोळी) : लक्षणे व नुकसान : कोबी, फुलकोबी, नवलकोल, मुळा, मोहरी इत्यादी पिकांवर ही कीड आढळते. अळी पानाच्या खालील बाजूस राहून पानाला छिद्रे पाडून हरितद्रव्य खाते. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पाने खाऊन त्यांची चाळण करते. पानांना फक्त शिराच शिल्लक राहतात.

नियंत्रण :

  • शेतात पक्षी बसण्यासाठी काठीचे मचाण लावावे.
  • एकरी ५ फेरोमोन सापळे लावावेत.
  • अळ्या दिसू लागताच नियंत्रणासाठी फवारण्या कराव्यात.
  • अ) पहिली फवारणी २ अळ्या प्रति रोप दिसू लागताच प्रमाण प्रतिलिटर बी. टी. (बॅसिलस थुरिंजनेसिस) १ ग्रॅम सूचना - फवारणी संध्याकाळच्या वेळी करावी.
  • ब) दुसरी फवारणी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा   अझाडिरॅक्‍टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि.
  • क) तिसरी फवारणी   प्रमाण प्रतिलिटर   इंडोक्‍साकार्ब १ मि.लि. किंवा    स्पिनोसॅड (२.५ एस.सी.) १ मि.लि.
  • ड) चौथी फवारणी (गरज पडल्यास)   फवारणी प्रतिलिटर   क्‍लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एस.सी.) ०.२ मि.लि.
  • संपर्क : सोमनाथ पवार, ९९२२५७२९३० (अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT