Two to three seed pods of Swarn vasundhara variety 
ॲग्रो गाईड

पर्वतीय, पठारी प्रदेशातील शेतीसाठी सोयाबीनची नवी जात : स्वर्ण वसुंधरा

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या रांची येथील पर्वतीय आणि पठारी प्रदेशातील शेतीसाठी संशोधन केंद्र येथे स्वर्ण वसुंधरा ही सोयाबीनची सुधारित जात विकसित केली आहे.

टीम अॅग्रोवन

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या रांची येथील पर्वतीय आणि पठारी प्रदेशातील शेतीसाठी संशोधन केंद्र येथे स्वर्ण वसुंधरा ही सोयाबीनची सुधारित जात विकसित केली आहे. ती भाजीसाठी म्हणजेच हिरव्या दाण्यासाठी तयार केली असून, झारखंडसह विविध राज्यांसाठी शिफारशीत आहे. उत्तर भारतामध्ये बहुतांश ठिकाणी सोयाबीनच्या हिरव्या दाण्याची भाजी आवडीने खाल्ली जाते. सोयाबीनची हिरव्या अवस्थेत म्हणजेच एकूण शेंगेच्या लांबीच्या सुमारे ८० ते ९० टक्के असताना काढणी करून भाजीसाठी वापरली जाते. हे दाणे नेहमीच्या सोयाबीनपेक्षा गुणधर्माने वेगळे असतात. त्यात त्याच्या रंगानुसार शर्करेचे प्रमाण अधिक म्हणजेच ७५ टक्क्यांपर्यंत असते. या हिरव्या दाण्यांसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या रांची येथील पर्वतीय आणि पठारी प्रदेशातील शेतीसाठी संशोधन केंद्र येथे स्वर्ण वसुंधरा ही सुधारित जात विकसित केली आहे. या जातीची शिफारस भारतातील व्यावसायिक लागवडीसाठी करण्यात आली आहे. लागवडीनंतर ७० ते ७५ दिवसांमध्ये हिरव्या शेंगाची पहिली काढणी शक्य होते. हिरव्या चमकदार शेंगातून ५० ते ५५ टक्के इतके बियांचे प्रमाण मिळू शकते. ८० ते ८५ दिवसांच्या कालावधीमध्ये साधारण तीन काढण्या शक्य होतात. या शेंगा म्हणजे पोषकतेचा अर्क आहेत. त्यातून पाचक प्रथिने, कर्बोदके, लिपीड्स, आवश्यक मेदाम्ले, फॉस्फरस, लोह, कॅल्शिअम, जस्त, थायामिन, रिबोफ्लॅविन, ई जीवनसत्त्व या बरोबरच तंतुमय पदार्थ आणि शर्करा उपलब्ध होतात. हिरव्या शेंगाची भाजी बनवली जाते. तर पक्व झालेल्या बिया मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरता येतात. ही जात झारखंड आणि अन्य राज्यांमध्ये प्रसारित केली असून, त्यातून शेतकऱ्यांचीही पोषकतेची गरज भागणार आहे. प्रक्रियेतून यशाकडे पुणे येथील चंद्रकांत देशमुख यांनी २०१९ मध्ये संस्थेतून स्वर्ण वसुंधरा सोयाबीन जातीचे ५० किलो बियाणे मिळवले. त्यातून बियाण्यांची निर्मिती करून त्यांनी २०२० मध्ये वरपूड, जि. परभणी येथील कराराने घेतलेल्या एका शेतामध्ये दहा एकर क्षेत्रात लागवड केली. काळ्या मातीमध्ये तुषार सिंचन पद्धतीचा वापर करताना त्यांनी ६० बाय १५ सेंमी असे अंतर ठेवले. प्रति एकर १५ क्विंटल हिरव्या शेंगाचे उत्पादन मिळाले. त्याचे प्रति एकर अर्थशास्त्र पुढील प्रकारे ः

  • उत्पादन खर्च (जमिनीचे भाडे, मशागत, सेंद्रिय व रासायनिक खते, सिंचन, आंतरमशागत, फवारणी आणि काढणी यांचा एकत्रित ) ः ३० हजार रुपये
  • हिरव्या शेंगांचे उत्पादन ः १५ क्विंटल
  • बाजारात मिळालेला सरासरी दर ः २०० रुपये प्रति किलो
  • एकूण उत्पन्न ः ३ लाख रुपये
  • निव्वळ उत्पन्न ः २ लाख ७० हजार रुपये.
  • प्रक्रिया केल्याने वाढतो फायदा शेंगांची हिरवा रंग आणि पोत तसाच राहण्यासाठी ब्लांचिंग प्रक्रिया केला. त्यामध्ये ९० अंश सेल्सिअस तापमानामध्ये शेंगा पाच मिनिटे ठेवून त्या बाहेर काढल्या. त्वरित ४ अंश सेल्सिअस इतक्या थंड पाण्यामध्ये त्या पाच मिनिटांसाठी बुडवल्या. त्यानंतर या शेंगा सामान्य तापमानाच्या पाण्यामध्ये पाच मिनिटे ठेवून त्यांची साठवण डीप फ्रिजरमध्ये केली. डीप फ्रिजरमध्ये शेंगांची साठवण वजा १८ अंश सेल्सिअस तापमानामध्ये केली. पुढील १८ महिन्यांपर्यंत विभागून शेंगाची विक्री केली. अशा प्रकारे ब्लांचिंग व गोठवण प्रक्रिया केलेल्या शेंगा पुणे, मुंबई, बंगळूर आणि हैदराबाद या बाजारांमध्ये मागणीनुसार पाठवल्या. या शेंगांना सरासरी ३०० रुपये प्रति किलो दर मिळाला. ब्लांचिंग केल्यानंतर एकल बिया असलेल्या शेंगा सोलून मिठासोबत खाल्ल्या जातात. अशा बियांना सुमारे ४०० रुपये प्रति किलो असा दर मिळतो. काही शेंगा पूर्ण पक्व झाल्यानंतर काढणी केली. त्याचे एकरी ७ क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला बाजारामध्ये १०० ते १५० रुपये प्रति किलो असा दर मिळाला. सोयाबीन पनीर (टोफू) उत्पादन पक्व सोयाबीन बियांपासून पनीर म्हणजेच टोफूनिर्मिती केली. साधारणपणे एक किलो बियांपासून २.२५ किलो टोफू तयार होतो. स्वर्ण वसुंधरा वाणांच्या बियांपासून बनवलेला हा टोफू पांढऱ्या रंगाचा, मऊ, जाळीदार होतो. त्याला शेंगाचा वास किंवा स्वाद अजिबात येत नाही. अशा टोफूला चांगली मागणी असून, ३०० रुपये प्रति किलो असा दर मिळतो. एक क्विंटल स्वर्ण वसुंधरा सोयाबीन बियांपासून २२५ किलो टोफू उत्पादन होतो. उत्पादनाचा खर्च १३ हजार रुपये इतका होतो. २२५ किलो टोफूच्या विक्रीतून निव्वळ नफा ५४,५०० रुपये इतका झाला. अन्य उत्पादने  सोयाबीन दाणे चांगले भाजून त्यापासून पीठ किंवा सत्त्व तयार केले जाते. हे सत्त्व अत्यंत पोषक असून, त्यालाही उत्तम बाजारपेठ मिळू शकते. नुसते दाणे ८ तास पाण्यामध्ये भिजवून सोयाबीन दूध, दही, छन्ना, गुलाब जामून, आइस्क्रीम असे विविध पदार्थांचे उत्पादन शक्य आहे.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

    Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

    Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

    Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

    Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

    SCROLL FOR NEXT