Weed Crop Agrowon
ॲग्रो गाईड

Weed Crop : तणनियंत्रणासाठी सोपे अवजार, गवत तलवार

फळबागांचे प्रमाण वाढत आहे. पावसाळ्यामध्ये बागेमध्ये तणे वेगाने वाढतात. तणांच्या प्रादुर्भावामुळे मुख्य पिकांना अन्न, पाणी, सूर्यप्रकाश इ. वाढीसाठी आवश्यक अशा घटकांची कमतरता भासते.

टीम ॲग्रोवन

डॉ. यू. आर. सांगळे, योगेश खरबीकर

फळबागांचे प्रमाण वाढत आहे. पावसाळ्यामध्ये बागेमध्ये तणे वेगाने वाढतात. तणांच्या प्रादुर्भावामुळे मुख्य पिकांना अन्न, पाणी, सूर्यप्रकाश इ. वाढीसाठी आवश्यक अशा घटकांची कमतरता भासते. पिकांचे पोषण (Weed Crop)अपुरे होऊन त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. तणांच्या काढणीसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने विलंब लागतो. या तणांवरील रोग-किडींचा फटका मुख्य पिकालाही (Weed Crop Damage) बसतो.

उदा. सध्या सप्टेंबरअखेर आणि पुढील काळामध्ये संत्रा फळे परिपक्व होण्यापूर्वीच गळून पडतात. गळलेली फळे ही पिवळ्या रंगाची व अधिक आंबट असल्याचे दिसते. त्यामागे कोलेटोट्रिकम ग्लास्पोरिऑइड्स नावाची बुरशी आहे. ही बुरशी बागेतील आर्द्रतेमुळे वाढतो. अधिक गवतामुळे बागेमध्ये आर्द्रता सतत टिकून राहण्यात मदत होते.

त्यामुळे उभे राहूनच वेगाने गवत काढण्याच्या उद्देशाने विविध यंत्रे व अवजारे तयार करण्यात आली आहेत. उदा. गवत तलवार, ग्रास कटर, ब्रश कटर इ. यातील काही यंत्रे ही इंधनावर चालतात. मात्र गवत तलवार हे हस्तचलित आहे. अन्य अवजारांच्या तुलनेने गवत तलवार स्वस्त असून, ३०० ते ३५० रुपयांपर्यंत मिळते. त्यामुळे वेगाने गवत छाटणी करता येते. बागेतील गवताचे प्रमाण एकदम कमी होते.

-गवताचे सेंद्रिय पदार्थ जमिनीत गाडल्यास त्यातील अन्नद्रव्ये मुख्य पिकाला उपलब्ध होता. तसेच जमिनीचा पोत सुधारतो. या सेंद्रिय पदार्थांवर जमिनीतील जिवाणू किंवा विविध सूक्ष्मजीवांचे पोषण होते.

-यात गवताची मुळे मातीत असल्यामुळे मातीची धूपही होत नाही. जमिनीवर त्याचे एक आच्छादन राहते.

-जमिनीमध्ये पाणी टिकून राहते.

डॉ. यू. आर. सांगळे, ९५१८९९२२१३

(वनस्पतिरोग शास्त्रज्ञ, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT