Monsoon Rain Agrowon
ॲग्रो गाईड

Monsoon Rain : मॉन्सून उघडण्याच्या मार्गावर

महाराष्ट्रातील हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतके वाढत आहेत. उद्यापासून महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल ते १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे.

Anil Jadhao ,  डॉ. रामचंद्र साबळे 

महाराष्ट्रातील हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतके वाढत आहेत. उद्यापासून महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल ते १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब (Maharashtra Wind Pressure) राहणार आहे. आज बंगालच्या उपसागराचे उत्तर (North Of Bangal Bay) व पश्‍चिमेकडील भागात कमी हवेचे दाब तयार होतील. केंद्रस्थानी हवेचे दाब १००० ते १००२ हेप्टापास्कल इतके कमी होऊन त्याचे रूपांतर चक्रीय वादळाच्या (Cyclonic Storms) निर्मितीत होईल. हे चक्रीय वादळ भारताचे पूर्व किनारपट्टीच्या दिशेने सरकेल. त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील पूर्व भागात पावसाची (Rain Prediction) निर्माण शक्‍यता होईल.

मंगळवार आणि बुधवारी (ता.२५ व २६) पूर्व विदर्भ व नांदेड भागात पावसाची शक्‍यता निर्माण होईल. शिवाय वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे पावसाची शक्‍यता वाढेल. ईशान्येकडून वाहणारे वारे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ढग वाहून आणतील व या भागातही पावसाची शक्‍यता निर्माण करतील. वाऱ्याचा ताशी वेग सामान्यच राहील.

विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात १८ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत घटेल. त्यामुळे सकाळच्या वेळी अल्पशी थंडी जाणवेल. कमाल तापमानातही घट होईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल व हवामान कोरडे राहील. ईशान्य मॉन्सून अस्ताकडे जाईल. उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भ या भागांतून मॉन्सून बाहेर पडला असून, उर्वरित महाराष्ट्रातही मॉन्सूनचा पाऊस थांबेल.

कोकण ः

आज सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्यापासून या दोन्ही जिल्ह्यांतून मॉन्सून बाहेर पडेल व पाऊस थांबेल. रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही. कारण या जिल्ह्यांतून आजच मॉन्सून बाहेर पडेल. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून आणि ताशी वेग ९ ते १२ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ६६ ते ७४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ४५ ते ५७ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र ः

नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांतून मॉन्सून बाहेर पडलेला असून, पाऊस थांबलेला आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून आणि ताशी वेग ५ ते ७ किमी राहील. कमाल तापमान जळगाव जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, नाशिक व धुळे जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर नंदूरबार जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, नाशिक व धुळे जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, नंदूरबार जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस व जळगाव जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६२ टक्के, तर दुपारची २४ ते ३७ टक्के राहील.

मराठवाडा ः

मराठवाडा भागातून मॉन्सून बाहेर पडलेला पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. औरंगाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ४ किमी, जालना, नांदेड, परभणी जिल्ह्यांत ९ कि.मी. राहील. लातूर, बीड, हिंगोली जिल्ह्यांत ताशी ११ ते १२ कि.मी. व उस्मानाबाद जिल्ह्यात ताशी १५ कि.मी. राहील. कमाल तापमान हिंगोली, उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर लातूर, नांदेड, बीड, परभणी व औरंगाबाद जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. पहाटे व सकाळी हवामान थंड राहील. थंडी जाणवण्यास सुरुवात होईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ७८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५० टक्के इतकी कमी राहील. हवामान दुपारी कोरडे राहील.

पश्‍चिम विदर्भ ः

आज व उद्या पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ६८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ४० टक्के राहील.

मध्य विदर्भ ः

आज व उद्या पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून आणि ताशी वेग ८ ते १० कि.मी. राहील. कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४८ टक्के राहील.

पूर्व विदर्भ ः

आज व उद्या पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून आणि ताशी वेग ७ ते ८ किमी राहील. कमाल तापमान भंडारा जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५० टक्के राहील. दुपारी हवामान कोरडे राहील. पूर्व विदर्भात चक्रीय वादळामुळे मंगळवार आणि बुधवारी (ता.२५ व २६) पावसाची शक्‍यता निर्माण होईल.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र ः

आज कोल्हापूर जिल्ह्यात १९ मि.मी., तर सातारा व सांगली जिल्ह्यांत प्रत्येकी १० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. या जिल्ह्यात उद्या पावसाची शक्‍यता नाही. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून आणि ताशी वेग १० ते १२ किमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, पुणे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर उर्वरित जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर व नगर जिल्ह्यांत १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. मात्र सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ६२ टक्के राहील.

कृषी सल्ला :

१) कोकणात रब्बी भुईमुगाची पेरणी करावी.

२) हळव्या भाताच्या जाती परिपक्व झाल्या असल्यास काढणी करून मळणी करावी.

३) सोयाबीनचे पीक परिपक्व झाले असल्यास कापणी करून मळणी करावी.

५) बागायती क्षेत्रात हरभरा, गहू, मोहरी पिकाची पेरणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT