Satara News : सोयाबीन व कडधान्ये हमीभावाने खरेदी करण्यात यावीत, यासाठी शासनाने तातडीने तालुकानिहाय हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे..स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व जिल्हा उपनिबंधकांना निवेदन दिले. या वेळी अर्जुन सांळुखे, मनोहर येवले, राज्य सदस्य स्वाभिमानी अध्यक्ष वाहतूक संघ रमेश पिसाळ, तालुकाध्यक्ष राजू घाडगे, मोहन घाडगे, सुधाकर शितोळे, संदीप काळंगे, अमोल पवार, महादेव डोंगरे, जनार्दन आवारे व शेतकरी उपस्थित होते..Soybean Price: नव्या सोयाबीनला ४३११ रुपयांचा दर.निवेदनात संघटनेने म्हटले, की निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सोयाबीन बाजारात येण्याअगोदर सरकारने सोयाबीन तेल, पेंड आयात केल्यामुळे दर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे भांडवली खर्चसुद्धा निघणार नाही. .अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करायचे सोडून सरकार आयात धोरणांचा वापर करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहे. त्यामुळे आता सरकारने जाहीर केलेल्या हमीभावानुसार सर्व शेतीमाल खरेदी करण्यासाठी तत्काळ जिल्ह्यात तालुकानिहाय सोयाबीन व कडधान्ये खरेदी केंद्र सुरू करावीत..Soybean Farmer Issue: सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशा.बाजार समितीच्या माध्यमातून परवानाधारक व बिगर परवानाधारक व्यापारी मनमानी पद्धतीने सोयाबीनमधील आर्द्रता धरून नियमांचे पालन न करता बेकायदेशीर खरेदी करून शेतकऱ्यांना लुटत आहेत. .यावर कायदेशीर निगराणी करून त्यांच्यावरही कारवाई करावी. या मागण्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते छापा टाकून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल, असा इशारा या निवेदनातून दिला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.