Dr. Sharad Gadakh Agrowon
ॲग्रो गाईड

Dr. Sharad Gadakh : गाईत संपूर्ण अर्थशास्त्र बदलण्याची ताकद

भारतीय संस्कृतीतील गाईचा आपल्याला विसर पडत चालला आहे. ही भारतीय संस्कृतीसाठी नक्कीच खेदाची बाब आहे.

Team Agrowon

Amravati News : ‘‘भारतीय संस्कृतीतील गाईचा आपल्याला विसर पडत चालला आहे. ही भारतीय संस्कृतीसाठी नक्कीच खेदाची बाब आहे.

गाईकडे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून न बघता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघण्याची गरज व्यक्त करतानाच गाईत संपूर्ण अर्थशास्त्र बदलण्याची ताकद आहे,’’ असे उदगार डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (Panjabrao Deshmukh Agriculture University) कुलगुरू डॉ. शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) यांनी काढले.

‘‘गाईचे धार्मिक तसेच शेती, दुग्ध व्यवसाय, पर्यावरण, ऊर्जा आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व लक्षात घेता गाईला सांभाळा, त्यांचे उत्तम संगोपन करा आणि मानवी जीवन समृद्ध करा,’’ असे आवाहनसुद्धा कुलगुरू डॉ. गडाख यांनी केले.

पिंपळखुटा येथील श्रीसंत शंकर महाराज गो-संगोपन व संशोधन गोशाळेचे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीसंत शंकर महाराज आश्रम ट्रस्टचे उपाध्यक्ष नंदूशेठ चव्हाण होते.

प्रमुख पाहुणे म्हणून कृषी जिल्हा अधीक्षक अनिल खर्चान, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. दमके, चंद्रपूरचे कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, डॉ. अनिल ठाकरे, डॉ. राजेंद्र वानखडे उपस्थित होते. श्रीसंत शंकरबाबा महाराज यांच्या उपस्थितीत गोशाळा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात झाला.

कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते श्रीसंत शंकर महाराज गोसंगोपन व संशोधन गोशाळेचे उद्घाटन थाटात झाले. याप्रसंगी सुमंत देशमुख, अ‍ॅड. अनिल जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव राजेंद्र लुंगे, विश्वस्त संतोष पोकळे, सुधाकर बांते, सुदाम नागपुरे, बाळासाहेब वाल्हेकर, शरद इंगळे, अ‍ॅड. प्रकाश देशमुख, अण्णाजी दिवे, कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रशांत शेलोकार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक व संचालन प्राचार्य भास्कर मोहोड यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. चंद्रकांत पाटील यांनी मानले. लोकार्पण सोहळ्याला भक्तगण, आश्रमाचे पदाधिकारी, गावकरी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याच कार्यक्रमात बोडखा येथील प्रयोगशील शेतकरी नामदेव वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. वैद्य यांनी कापूस, सोयाबीन या पिकांसाठी विविध प्रकारचे अवजारे विकसित केली आहेत.

गरजेवर आधारित आणि कमी खर्चाची ही अवजारे असल्याने या अवजारांना शेतकऱ्यांमधून चांगली मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT