Election Commission Of India Agrowon
ॲग्रो विशेष

Local Body Election : ‘झेडपी’, पंचायत निवडणुकीचे पडघम

ZP Election : विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम केल्याचा मोबदला म्हणून अनेक कार्यकर्त्यांना आता झेडपी सदस्य होण्याचे स्वप्न पडू लागले आहे.

Team Agrowon

Amarvati News : राज्यात विधानसभा निवडणूक व खातेवाटप झाल्यानंतर आता ग्रामीण भागातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना वेध लागले आहे ते जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतील प्रवेशाचे.

विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम केल्याचा मोबदला म्हणून अनेक कार्यकर्त्यांना आता झेडपी सदस्य होण्याचे स्वप्न पडू लागले आहे. अद्याप निवडणुकीची घोषणा जरी झाली नसली, तरी राज्यातील एकूणच राजकीय वातावरण पाहता लवकरच घोषणा होण्याची शक्यता कार्यकर्त्यांना वाटत आहे.

विशेष म्हणजे, पूर्वीच्या ५९ सर्कलमध्ये वाढ झाल्यानंतर ६६ जागांसाठी निवडणूक होईल. अमरावती जिल्ह्यातील आठ पैकी सात मतदार संघांना ग्रामीण भागाचा टच असल्याने विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या वेळी चांगलेच सक्रिय झाले होते.

विधानसभेच्या निमित्ताने ग्रामीण भागात आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न प्रत्येकच पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५९ वरून ६६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

विशेष म्हणजे पंचायत समितीची सदस्यसंख्यासुद्धा ११८ वरून १३२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. २०२२ मध्ये कार्यकाळ संपल्याने तेव्हापासून जिल्हा परिषदेवर प्रशासकांची नियुक्ती आहे.

एकाच वेळी होणार पंचायत समितीची रणधुमाळी

जिल्हा परिषदेसह १४ पैकी ११ पंचायत समित्यांवर गत अडीच वर्षांपासून प्रशासकराज आहे. याशिवाय धामणगावरेल्वे, तिवसा व चांदूररेल्वे या पंचायत समित्यांचा कार्यकाळ देखील १४ डिसेंबरला संपुष्टात आला आहे. त्यामुळे यावेळी १४ पंचायत समित्यांमध्ये निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. त्यामुळे इच्छुकांना अच्छे दिन येणार असल्याचे मानले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT