Zendu Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Zendu Crop Management : जुन्नर तालुक्यातील तानाजी साळुंखे यांचे झेंडू नियोजन

Pune News : पुणे जिल्ह्यातील वडज (ता. जुन्नर) येथे तानाजी साळुंखे यांची साडेचार एकर शेती आहे. त्यात कांदा, टोमॅटो, ज्वारी, बाजरी, सोयाबीन अशी विविध हंगामी पिके घेतली जातात.

Team Agrowon

शेतकरी : तानाजी साळुंखे

गाव : वडज, ता. जुन्नर, जि. पुणे

एकूण शेती : साडेचार एकर

झेंडू लागवड : अर्धा एकर

Flower Farming : पुणे जिल्ह्यातील वडज (ता. जुन्नर) येथे तानाजी साळुंखे यांची साडेचार एकर शेती आहे. त्यात कांदा, टोमॅटो, ज्वारी, बाजरी, सोयाबीन अशी विविध हंगामी पिके घेतली जातात. याशिवाय झेंडू, शेवंती या फुलपिकांची देखील लागवड केली जाते.

या वर्षी त्यांनी उन्हाळी झेडूची अर्धा एकरात लागवड केली आहे. सध्या या लागवडीतून फुलांचे उत्पादन सुरू आहे. लग्नसराईमुळे फुलांचे चांगले दर मिळत आहेत.

नियोजनातील बाबी

- अर्धा एकरावर उन्हाळी हंगामात झेंडू लागवडीचे नियोजन केले होते. त्यानुसार शेताची पूर्वमशागत करून घेतली.

- नांगरट करून रासायनिक आणि सेंद्रिय खतांचे बेसल डोस दिले.

- लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्राने ४ फुटांचे बेड तयार करून घेतले.

- बेड तयार केल्यानंतर मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाच्या नळ्या टाकून घेतल्या.

- सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर बेड पूर्ण एक रात्र चांगले भिजवून घेतले.

- लागवडीसाठी रोपांची उपलब्धता करून घेतली. अर्धा एकर लागवडीसाठी साधारण तीन ते सव्वातीन हजार रोपे लागली.

- लागवड पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांनी मुळीच्या वाढीसाठी ह्युमिक ॲसिड आणि बुरशीनाशकांचे ड्रेचिंग केले.

- साधारण ८ दिवसांनी रोपांच्या वाढीसाठी १९ः१९ः१९ ची मात्रा दिली.

- लागवडीनंतर ८ ते १० दिवसांनी रोपांवर करपा रोग आणि नागअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक रासायनिक फवारणी घेतली.

- रोपांच्या आणि कळीच्या वाढीसाठी १-ः६१ः०, १३ः०ः४५ या खतांची मात्रा दर पाच दिवसांनी दिल्या.

- साधारण १५ दिवसांनी आलेल्या लहान कळ्या खुडण्याचे नियोजन केले. कळी खुडण्यामुळे जास्त फुटवे येऊन उत्पादन चांगले मिळते.

- दर्जेदार उत्पादनासाठी कीड-रोग, अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर दिला.

काढणी नियोजन

- लागवडीनंतर ४५ दिवसांनी फुलांची तोड सुरू झाली आहे.

- फुलांचे उत्पादन सुरू झाल्यानंतर दर दोन दिवसांनी फुलतोडणीचे नियोजन असते. प्रत्येक तोडणीला ३०० ते ४०० किलो फुलांचे उत्पादन मिळते आहे.

- फुलांच्या तोडणीदरम्यान नियमित ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे आणि विद्राव्य खतांचे काटेकोर नियोजन ठेवले आहे.

- आतापर्यंत अर्धा एकर झेंडू लागवडीतून साधारण ३ हजार किलो फुलांचे उत्पादन मिळाले आहे.

विक्री नियोजन

- काढणी झालेली सर्व झेंडू फुले मुंबई येथील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविली जातात. सध्या उन्हाळी हंगामात बाजार पेठेत फुलांची आवक कमी असून, लग्नसराईमुळे फुलांना चांगले दर मिळत आहेत.

- या हंगामात साधारण ४० ते ८० रुपये प्रति किलो दराने फुलांची विक्री केली आहे. यामध्ये सरासरी ६० रुपये दर मिळाला आहे.

संपर्क - तानाजी साळुंखे, ९६६५०७९९५९, (शब्दांकन - गणेश कोरे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection : नांदेड जिल्ह्यात आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Dam Water Levels : लघू प्रकल्पात १२, मध्यम प्रकल्पात १४ टक्के पाणीसाठा

Road Protest : सासुरे-कौठाळी रस्त्यासाठी ‘रास्ता रोको’

Water Scarcity : पाणीटंचाई टाळण्यासाठी वर्षभराचे नियोजन करा; पालकमंत्री जयकुमार गोरे

Goat Farming : शास्त्रीय व्यवस्थापनातून शेळीपालनात शाश्वत उत्पन्न

SCROLL FOR NEXT