Jijau Sculpture  Agrowon
ॲग्रो विशेष

Jijau Sculpture : माँ जिजाऊंचे जगातील पहिले ‘ॲनॉमॉर्फिक स्कल्प्चर’ शिल्प

 गोपाल हागे

Buldana News : दृष्टिभ्रमावर आधारीत असलेला कलाप्रकार म्हणजे ‘ॲनॉमॉर्फिक स्कल्प्चर’ अर्थात इल्यूजन आर्ट. या कलाप्रकारातून राजमाता जिजाऊंचे जगातील पहिले शिल्प येथील जिजाऊ सृष्टी परिसरात साकारले असून जन्मदिनी शुक्रवारी (ता. १२) होत असलेल्या सोहळ्यात याचे उद्‌घाटन केले जाणार आहे.

खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनचे सचिव राजेंद्र कोल्हे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी सेवाकार्य दिले आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनात हे खास शिल्प साकारण्यात आले आहे.

जिजाऊ सृष्टी परिसरात जिजाऊंचे हे ३० फूट उंचीचे शिल्प आहे. एका ठिकाणावरून व विशिष्ट अंतरावरून पाहिले तरच यामध्ये प्रतिमा दिसून येईल. अशा पद्धतीने काही मोजक्याच ठिकाणीच शिल्पे तयार झालेली आहेत.

ही संकल्पना राजेंद्र कोल्हे यांनी साकारली. तरुणाई फाउंडेशनच्या पुढाकाराने यापूर्वी सालईबन (ता. जळगाव जामोद) या ठिकाणी महात्मा गांधींचे शिल्प अशा पद्धतीने साकारण्यात आले होते.

त्यानंतर जिजाऊंचे शिल्प तयार केले. यासाठी तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पिठोरे पाटील, मंजितसिंग शीख, अविनाश सोनटक्के, हरिभाऊ गायकवाड, राजकुमार मेहेत्रे, गोपाल पवार, पुरुषोत्तम बदामे, मराठा सेवा संघाचे सुभाषराव कोल्हे, रवींद्र चेके, सचिन तायडे यांच्यासह इतरांनी पुढाकार घेतला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT