Flood Affected Kolhapur 
ॲग्रो विशेष

Flood Affected Kolhapur : जागतिक बँकेचे पथक कोल्हापूर दौऱ्यावर, पूरबाधित भागाची करणार पाहणी

sandeep Shirguppe

Kolhapur Sangli Flood : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्यातून पूरनियंत्रण प्रकल्प होणार आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेचे पथक मंगळवारपासून (ता. २५) जिल्हा दौऱ्यावर येत आहे. पहिल्या दिवशी महापालिका क्षेत्रातील पूरबाधित भागाची पाहणी केली जाणार आहे. या वेळी महापालिकेकडून विविध उपाययोजनांच्या आराखड्याचे सादरीकरणही त्यांच्यासमोर होणार आहे.

या दौऱ्यासाठी कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील जबाबदारी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यावर आहे. त्याचबरोबर इचलकरंजी महापालिका क्षेत्राची जबाबदारी आयुक्त ओमप्रकाश दिवटे; तर उर्वरित जिल्ह्यातील पूरबाधित भागाच्या पाहणी दौऱ्याची जबाबदारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्याकडे देण्यात आली आहे. मंगळवारी हे पथक शहरातील पूरबाधित भागाची पाहणी करणार आहे.

दरम्यान, महापालिकेमध्ये आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून विविध उपाययोजनांचे सादरीकरण त्यांच्यासमोर केले जाणार आहे. यावेळी महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित असतील. यापूर्वीही बँकेच्या पथकाने शहरातील पूरबाधित परिसराची पाहणी केली आहे.

या पथकामध्ये बँकेचे अधिकारी आभास झा, जोलंटा क्रॅस्पिन-वॅटसन, सत्यप्रिया, अनुप कर्नाथ, दीपक सिंग, संगीता पटेल, सविनय ग्रोवर, नेहा व्यास, युकिओ टनाका, शीना अरोरा, डॉ. अभिजित सहा, ऋषिकेश कोलटकर, अतुल खुराना, रुमिता चौधरी आदींचा समावेश आहे. हे पथके कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर यांच्या उपस्थितीत प्रकल्पाविषयी सादरीकरणही होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flood Affected Farmer : महापूर बाधित शेतकऱ्यांना मिळणार पैसे, कोल्हापूर कृषी विभागाकडून याद्या अपलोडींगचे काम सुरू

Nandurbar Earthquake : नंदुरबार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

Primary Education : हृदय तृप्त करणारे हवे शिक्षण

Market Committee Council : परिषदेचा उठलेला ‘बाजार’

Agriculture Department : अधिकाऱ्यांच्या पदनाम बदलाच्या मागणीस कृषिमंत्र्यांचा दुजोरा

SCROLL FOR NEXT