Kolhapur Flood : धास्ती महापुराची! आपत्ती व्यवस्थापन विभागात ड्रोन, बोटची होणार खरेदी

Heavy Flood Kolhapur : बैठकीत पूरव्यवस्थापनासाठी आवश्‍यक ड्रोन, बोट आदी साहित्याची खरेदी करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
Kolhapur Flood
Kolhapur Floodagrowon
Published on
Updated on

Kolhapur Collector : पावसाळा सुरू झाला असून, संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर ड्रोन व बोट खरेदी करण्यासह विविध महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमोल येडगे होते.

अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महापालिका उपायुक्त पंडित पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संजय रणवीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

बैठकीत पूरव्यवस्थापनासाठी आवश्‍यक ड्रोन, बोट आदी साहित्याची खरेदी करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. पंचगंगा नदीपात्रात येणाऱ्या पूरपरिस्थितीत पूर्वसूचना मिळविण्यासाठी राबवावयाच्या प्रकल्पास आपत्ती सौम्यीकरण निधीमधून निधीची मागणी करण्यास सर्व सदस्यांनी मान्यता दिली. त्याचबरोबर जिओ लोकेशन सिस्टिम, एअर बोट, लाईप सेव्हर रोबोट, लँडस्लाईड डिटेक्शन ॲंड वार्निंग सिस्टीम आदी अत्याधुनिक सामुग्री राज्य शासनाकडे मागणी करण्याबाबतही यावेळी ठरले.

Kolhapur Flood
Sangli Kolhapur Flood : महापूर काळात सांगली जलसंपदा विभाग निवांत; कर्नाटकच्या अधिकाऱ्यांशी संपर्कच नाही, अहवालातून स्पष्ट

पूरनियंत्रण प्रकल्पाबाबत होणार चर्चा

जागतिक बँकेच्या सहकार्यातून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी पूरनियंत्रण प्रकल्प होणार आहे. या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळी भागाला वळविण्यात येणार आहे. यासाठी या बँकेचे पथक सोमवार (ता.२४) पासून शुक्रवारपर्यंत (ता. २८) जिल्हा दौऱ्यावर येत आहे.

हे पथक सर्व प्रकल्प अंमलबजावणी कक्षांना भेट देणार आहे. या पथकामध्ये बँकेचे अधिकारी आभास झा, जोलंटा क्रॅस्पिन-वॅटसन, सत्यप्रिया, अनुप कर्नाथ, दीपक सिंग, संगीता पटेल, सविनय ग्रोवर, नेहा व्यास, युकिओ टनाका, शीना अरोरा, डॉ. अभिजित सहा, ऋषिकेश कोलटकर, अतुल खुराना, रुमिता चौधरी आदींचा समावेश आहे. हे पथके कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर यांच्या उपस्थितीत प्रकल्पाविषयी सादरीकरणही होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com