Jalyukt Shiwar  Agrowon
ॲग्रो विशेष

Jalyukt Shiwar Work : टंचाईग्रस्त ४५ गावांत ‘जलयुक्त’ची कामे

Water Scarcity : जी गावे टंचाईग्रस्त आहेत आणि वर्षोनुवर्षे त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे, अशा गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या टप्पा क्रमांक दोनअंतर्गत प्राधान्याने कामे होणार आहेत.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यातील जी गावे टंचाईग्रस्त आहेत आणि वर्षोनुवर्षे त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे, अशा गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या टप्पा क्रमांक दोनअंतर्गत प्राधान्याने कामे होणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडे ९.४६ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, यातून प्रामुख्याने सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती व नवीन सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्यात येणार आहेत.

राज्य सरकारने २०१५ ते १९ या काळात जलयुक्त शिवार योजनेतून २२ हजार ५९३ गावांमध्ये मृद व जलसंधारणाची ६ लाख ३२ हजार ८९६ कामे करून २० हजार ५४४ गावे जलपरिपूर्ण केली आहेत. या योजनेतून २७ लाख टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण करण्यात आली. शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा जलयुक्त शिवार अभियान २.० ही योजना पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यात गावातील पाण्याचा ताळेबंद करून त्यानुसार मृद व जलसंधारण, पाण्याचा शाश्‍वत स्रोत उपलब्ध करणे, पाण्याचा अतिवापर झालेल्या भागात भूजल पातळी वाढवणे ही कामे केली जाणार आहेत. यासाठी भूजल पातळी व अवर्षणग्रस्त भाग या निकषांवर गावांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या गावांचा जलआराखडा तयार करून त्यानुसार गावात पाणलोट विकास करणे, जलसंधारण करणे, अपधाव रोखणे आदी कामे केली जाणार आहेत.

जलसंधारण विभाग व जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून ही कामे होणार आहेत. त्यासाठी १५ तालुक्यांतील ४५ गावांची निवड करण्यात आली आहे. ‘जलयुक्त’च्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, डिसेंबरअखेर या सर्व कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. सूर्यवंशी यांनी दिली.

तालुकानिहाय गावे आणि निधी :

तालुका गावे निधी

नांदगाव ४ १ कोटी १३ लाख

मालेगाव ६ १ कोटी ५६ लाख

येवला ७ १ कोटी तीन लाख

इगतपुरी ३ ५९ लाख ९० हजार

त्र्यंबकेश्वर १ ३९ लाख ९६ हजार

दिंडोरी ४ ६५ लाख ६७ हजार

पेठ २ २५ लाख ११ हजार

निफाड ३ ५४ लाख ८० हजार

बागलाण ३ ८७ लाख ९८ हजार

सुरगाणा २ ७७ लाख ९६ हजार

कळवण १ ५ लाख

चांदवड ४ ४३ लाख ९० हजार

नाशिक २ ३० लाख १३ हजार

सिन्नर २ ४१ लाख ९८ हजार

देवळा १ ३९ लाख ८९ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT