Maharashtra Forest Department Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Workers Precautions : मजुरांनी ऊस तोडणी करताना बिबट प्रवण क्षेत्रात काळजी घेण्याचे आवाहन

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वच भागात बिबट्याचा वावर आहे. आता साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होत असून, ऊसतोडणी करताना मजुरांनी व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल यांनी सांगितले, की साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झालेले आहेत. त्यामुळे ऊसतोडणीला सुरुवात होत आहे. बहुतांश भागात बिबट्याचा वावर सुरू आहे. बिबटे आढळून येत असल्याने ऊसतोडणी सुरू असताना मजुरांनी व शेतकऱ्यांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

अनेकदा त्यांना ऊसतोड सुरू असलेल्या भागातच खेळायला मोकळे सोडले जाते. मुलांना ठेवलेल्या ठिकाणी हातात घुंगराची काठी घेऊन मोठ्या व्यक्तीस थांबवावे, जेणेकरून बिबट्या दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येते. खूप वाकून ऊसतोड करू नये. अशा वेळी दुसराच एखादा प्राणी आहे असे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो.

ऊसतोड सुरू असताना ट्रॅक्टरमधील टेपरेकॉर्डरवर किंवा चांगल्या वायरलेस ब्ल्यू टूथ स्पीकरचा वापर करून मोठ्या आवाजात गाणी सुरू ठेवावीत, यामुळे बिबट्या जवळ येण्याची शक्यता कमी होते. ऊसतोडणी किंवा शेतीची कामे करत असताना समूहाने कामे करावीत. एकट्या व्यक्तीने ऊसतोड किंवा शेतीची कामे करू नयेत.

गावाजवळ, जंगलात, शेतात अथवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यास गर्दी करू नये, त्यांना दगड मारून पळवण्याचा प्रयत्न अथवा मोबाइलवर फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. बिबट तसेच बिबट्याची पिले आढळल्यास तत्काळ संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी याच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Contamination : पावसाळ्यात ग्रामीण भागात दूषित पाण्याचे प्रमाण वाढले

Crop Damage : बुलडाणा जिल्ह्यात पावसाने पुन्हा धूळधाण

Cashew Orchards : रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादकांना १० वर्षानंतर न्याय; २०१५ मध्ये अवकाळीने नुकसानग्रस्तांना मिळणार व्याजाची रक्कम

Kharif Season Crop : हरियाणात हमीभावावर धान खरेदी सुरू; शेतकऱ्यांना आता पर्यंत ३३८७ कोटींचे वाटप

Dharashiv Dcc Bank : लोकसभा निवडणुकीनंतरच धाराशिव ‘डीसीसी’चे पुनरुज्जीवन

SCROLL FOR NEXT