Drought  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Crisis : दुष्काळी भागात विहिरीतील गाळ काढण्याची कामे सुरू

Drought Update : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा शाश्‍वत स्रोत करण्यासाठी पावसाच्या पाण्याचा थेंब शिवारात अडवून जिरविण्यासाठी जिरायती पट्ट्यातील शेतकरी उन्हाळ्यात कामे करत आहेत.

Team Agrowon

Baramati News : एकीकडे कडक उन्हाळा, तर दुसरीकडे पाण्याची तीव्र टंचाई अशी परिस्थिती असली तर येणाऱ्या पावसाळ्यात व खरीप हंगामात शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून सध्या बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील विहिरीतील गाळ काढणे, आडवे छिद्र पाडून पाण्याचे झरे खुले करणे, नैसर्गिक पाणीसाठ्याच्या ठिकाणातील गाळ काढण्याच्या कामांची लगबग शेतशिवारात सुरू झाली आहे.

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा शाश्‍वत स्रोत करण्यासाठी पावसाच्या पाण्याचा थेंब शिवारात अडवून जिरविण्यासाठी जिरायती पट्ट्यातील शेतकरी उन्हाळ्यात कामे करत आहेत. कायमस्वरूपी सिंचनयोजना नसल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विहिरीच्या पाण्यावरच शेतीसिंचनाचा प्रश्न सोडवावा लागतो.

सध्या ५० ते २०० फुटांच्या अंतरावर विहिरीत आडवे छिद्र पाडून नैसर्गिक झरे खुले करून पाणी मिळविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. तर दुसरीकडे विहिरीतील साचलेला गाळ काढून पाणीसाठवणूक क्षमता वाढविणे व गाळाने बुजलेले नैसर्गिक झरे खुले करणे हे काम शेतकरी प्राधान्याने करीत आहेत.

त्यामुळे सध्या आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या गाळ काढण्याच्या मशिन, आडवे छिद्र पाडण्याच्या मशिन यांना सोन्याचे दिवस आले आहेत. पंधरा जून ते पंधरा जुलै हा खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीचा हंगाम असतो. मात्र, दर वर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाची हजेरी जिरायती भागात लागते.

त्यामुळे अवकाळी पावसापूर्वी व खरीप हंगामाच्या पूर्वी ही कामे करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. सध्या आर्थिक टंचाई असली तरी उसनवारी आणि कर्ज काढून विहिरीतील गाळ काढणे व जलस्रोत बळकट करण्यासाठी आवश्यक काम शिवारात व शेतात करून घेण्याकडे कल असल्याची माहिती मोरगाव येथील शेतकरी विकास तावरे, पिंटू तावरे, दिगंबर तावरे, तरडोली येथील शेतकरी विशाल पवार, विनायक गाडे, राजेंद्र वाघ यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT