Agriculture Credit Society  Agrowon
ॲग्रो विशेष

Cooperative Society : पुणे जिल्ह्यातील ११९२ विकास संस्थांच्या संगणकीकरणाचे काम सुरू

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) आपले काम गतिमान करण्यासाठी पावले उचलली आहेत. केंद्र सरकारच्या पुढाकाराने विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या संगणकीकरण योजनेत ‘पीडीसीसी’शी संलग्न असलेल्या एक हजार १९२ विकास सोसायट्या पात्र ठरल्या आहेत. यासाठी सहकार विभागाने पुढाकार घेतला असून निवड झालेल्या विकास सोसायट्यांचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्यात विकास सोसायट्याचे व त्यांच्या कामकाजाची गतिमानता वाढविण्यासाठी, तत्काळ विविध सेवा उपलब्ध होण्यासाठी संगणकीकरण महत्त्वपूर्ण आहे. त्याकरिता खेड, शिरूर, दौंड आणि इंदापूर या चार तालुक्यांमध्ये संगणकीकरण समूह (क्लस्टर्स) स्थापन केले आहेत.

या क्लस्टर्समधील ५५५ विकास संस्थांचे संगणकीकरण करण्याकरिता आवश्यक ते कामकाज राज्याच्या सहकार विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे सोसायट्यांचे संगणकीकरण लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

इंदापूरमधील सर्वाधिक सोसायट्या

जिल्हा बँकेच्या संगणकीकरणासाठी पात्र ठरलेल्या तालुकानिहाय विकास सोसायट्यांमध्ये सर्वाधिक २०१ सोसायट्या या इंदापूर तालुक्यातील आहेत. तर, आंबेगावमधील ५८, बारामती १७८, भोर ५३, दौंड १२३, हवेली ९६, जुन्नर ७४, खेड १०३, मावळ ३१, मुळशी ४६, पुरंदर ९५, शिरूर १२७ आणि वेल्हे ६ मिळून एक हजार १९२ सोसायट्यांचा समावेश आहे. जिल्हा बँकेशी संबंधित एकूण एक हजार ३२६ सोसायट्या असल्याची माहिती बँकेच्या प्रशासन विभागाकडून मिळाली.

विविध कार्यकारी सेवा संस्थांचे कामकाज प्रभावी आणि गतिमान होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील शाखांमध्ये संगणकीकरणाचा निर्णय घेतला आहे. बँकेशी निगडित असलेल्या शाखांमध्ये सहकार विभागाच्या माध्यमातून संगणकीकरण करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात बँकेचे काम अधिक गतिमान झालेले दिसेल.
- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT