Cooperative Credit Society : सोसायट्यांमधील हेराफेरीला संगणकीकरणामुळे चाप

Credit Society Computerization : राज्यातील बारा हजार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या संगणकीकरणाची कामे वेगाने पुढे सरकत आहेत.
Agriculture Credit Society
Agriculture Credit Society Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील बारा हजार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या संगणकीकरणाची कामे वेगाने पुढे सरकत आहेत. पहिल्या टप्प्यात दीड हजार सोसायट्यांची कामे पूर्णत्वाला जाण्याची चिन्हे आहे. संगणकीकरणानंतर सोसायट्यांमधील हेराफेरी थांबून शेतकऱ्यांना जलद सेवा मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

देशातील सर्व विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संगणकीकरणाचा प्रकल्प केंद्रीय सहकार खाते राबवत आहे. विशेष म्हणजे कामकाजाचा आढावा स्वतः सहकारमंत्री अमित शहा घेत आहेत. त्यामुळे इतर योजनांसारखा लालफितीचा कारभार या प्रकल्पात आडवा आलेला नाही. सोसायट्यांसाठी केंद्रानेच ‘एनएसपीएलव्ही’ नावाने सॉफ्टवेअर आणले आहे.

Agriculture Credit Society
Co-operative Credit Society : ‘सोसायट्या’ ठराव्यात गावविकास केंद्र

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सरकारी नियंत्रणाखालील तंत्रज्ञान कंपनीने या प्रकल्पात काम करावे, अशा सूचना केंद्रीय सहकार मंत्रालयाने दिलेल्या होत्या. त्यानुसार, सरकारी नियंत्रणातील ‘आयटीएल’ या मातब्बर कंपनीला सोसायट्यांच्या संगणकीकरणात सामावून घेतले गेले आहे. या कंपनीने मुंबईतील रेल्वेची सिग्नल यंत्रणा तसेच ईशान्य भारतातील संदेश दळणवळण उभारणीत मोलाची कामगिरी बजावली आहे.

संगणकीकरण होताच सोसायट्यांना कर्जदार शेतकऱ्याने केलेली कर्जफेड सध्यासारखी केव्हाही दाखवता येणार नाही. कर्जफेड करताच केंद्र, राज्य शासन, नाबार्ड, सहकार आयुक्तालय, जिल्हा बॅंका तसेच जिल्हा उपनिबंधकांना माहिती उपलब्ध होईल.

‘‘सोसायट्यांमधून कर्जफेड करताना ‘नवं-जुनं’ करण्याची पद्धत असते. यामुळे शेतकऱ्यांची सोय होत असली तरी काही भागात शेतकऱ्याची पिळवणूकदेखील होते. या गैरप्रकारांना संगणकीकरणामुळे आळा बसेल,’’ असे सहकार विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Agriculture Credit Society
Credit Society : ‘सेवा सोसायट्या’ वाचविण्यासाठी ‘देखरेख संघ’ कार्यान्वित करा

हा प्रकल्प राज्यभर लागू होताच सोसायट्यांच्या सचिवांची जबाबदारी वाढणार आहे. कोणतीही माहिती सोसायट्यांना दडवून ठेवता येणार नाही. पारदर्शकता व जलद कारभाराला प्रोत्साहन मिळेल.

सोसायट्यांच्या या सॉफ्टेवेअरला पुढे भूमिअभिलेख माहितीची संलग्नता (इंटिग्रेशन) देण्याचा विचार केंद्राकडून चालू आहे. त्यामुळे घेतलेल्या पीककर्जाचा वापर खरोखर पिकासाठी झाला की नाही, हे सरकारी यंत्रणेला तत्काळ समजणार आहे.

संगणकीकरणाची कामे करणाऱ्या कंपन्या ः इन्फ्युज (मुंबई), चॉइस (मुंबई) व आयटीएल (बंगरुळू).

कामाचे टप्पे ः राज्यातील २१ हजार पैकी १२ हजार सोसायट्यांची निवड. त्यातील अंदाजे दीड हजार सोसायट्यांचे पहिल्या टप्प्यात संगणकीकरण.

कंपन्यांकडून चालू असलेली कामे ः पाच टप्प्यात संगणकीकरण पूर्ण करते आहे. सोसायट्यांच्या सर्व दस्तवेजांमधील माहितीचे संकलन.

‘ही’ माहिती संकलित होते आहे ः कर्जदार किती, जमीन, पिके, घेतलेली कर्जे, सोसायटीचा ताळेबंद, इतर व्यवहार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com