Devendra Fadanvis Agrowon
ॲग्रो विशेष

Devendra Fadanvis : नैसर्गिक शेतीसाठी काम करावे

Work For Natural Farming : ‘‘हवामान बदलाच्या काळात पीकवाण संशोधनासोबतच आता नैसर्गिक शेतीसाठी काम करावे,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Team Agrowon

Akola News : ‘‘हवामान बदलाच्या काळात पीकवाण संशोधनासोबतच आता नैसर्गिक शेतीसाठी काम करावे,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कृषी विद्यापीठात आयोजित ‘ॲग्रोटेक २०२३’ या कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सवाच्या उद्‌घाटन प्रसंगी श्री. फडणवीस बोलत होते.

या वेळी आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकडे, हरीश पिंपळे, आकाश फुंडकर, वसंत खंडेलवाल, विप्‍लव बाजोरिया, कुलगुरू डॉ. शरद गडाख, रावसाहेब भागडे उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘डॉ. पंजाबराव देशमुख यांनी जवळपास १० वर्षे कृषिमंत्री म्हणून काम केले. त्यामुळे देशातल्या शेतीत एक मोठे परिवर्तन पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे प्रयोग केले. पुढे भारताला अन्नधान्य क्षेत्रामध्ये स्वयंपूर्णता मिळाली. माझा शेतकरी सुशिक्षित असला पाहिजे,

त्याला शेतीच्या पारंपरिक ज्ञानासोबत शेतीतले विज्ञानही समजले पाहिजे तरच माझा शेतकरी हा समृद्ध होऊ शकेल, असे त्यांचे विचार होते. त्यांची १२५ वी जयंती साजरी करताना या देशावर, या महाराष्ट्रावर आणि या विदर्भाच्या भूमीवर त्यांनी जे उपकार केले ते आपण कधीच विसरू शकत नाही.’’

‘‘गेल्या आठवड्यात केंद्राची टीम महाराष्ट्रात आली. या टीमने देखील महाराष्ट्राचा दौरा करताना एकाच जिल्ह्यात काही भागात अवर्षण, काही भागात अतिवृष्टी, काही ठिकाणी गारपीट बघायला मिळाल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत शेती ही वातावरणाच्या बदलाला अनुकूल कशी करता येईल हे लक्षात घ्यावे.

तशा प्रकारचे वाण कसे विकसित करता येतील, हे पाहावे. हवामान बदल, जलवायू परिवर्तनाचे परिणाम आपण समजून घेतले नाहीत तर आपण शेतकऱ्याला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढू शकणार नाही. कृषी विद्यापीठाला पशुवैद्यकीय महाविद्यालय दिले. विद्यापीठाचे इन्फ्रास्ट्रक्चर नवीन करण्याची आवश्यकता आहे.

त्याचाही प्रस्ताव कुलगुरूंनी दिला आहे. पुढच्या बजेटमध्ये यासाठी निधी देऊ. सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली. शेतीसाठीची संपूर्ण वीज तीन वर्षांत सौरवर आणली जाईल. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देता येईल,’’ असे फडणवीस म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT