Tourism
Tourism Agrowon
ॲग्रो विशेष

पर्यटन विकासाद्वारे महिलांनी व्यवसाय सुरू करावे ः घोलप

टीम ॲग्रोवन

फुलवडे, ता. आंबेगाव ः ‘‘तालुक्यात १२ ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. पर्यटन विकासाच्या माध्यमातून महिलांनी प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करावेत,’’ असे आवाहन यशवर्धिनी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार घोलप यांनी केले.

यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आंबेगावच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटांमध्ये होणाऱ्या वार्षिक उलाढालीची मांडणी सर्व महिलांच्या समोर व्हावी आणि पुढील आर्थिक वर्षासाठी वार्षिक नियोजन व्हावे, या उद्देशाने आदिवासी महिला बचत गटांची वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी घोलप यांनी मार्गदर्शन केले.

मेळाव्यासाठी कोंढवळ, ढगेवाडी, तेरुंगण, चिखली म्हतारबाची वाडी, निगडाळे, जांभोरी, तळेघर, काळवाडी, जांभोरी, पोखरी येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. घोलप यांनी ‘उद्योजकता विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी वार्षिक मूल्यांकनाच्या आधारावर महिला बचत गटांचा गौरव करण्यात आला. यामध्ये महालक्ष्मी बचत गट (निगडाळे), कळमजा (लोहारवाडी), सरस्वती (पोखरी) आणि काळूबाई (पालखेवाडी), सावदबाबा (कोंढवळ) व शिवशक्ती चिखली या महिला बचत गटांचा समावेश आहे.

या प्रसंगी सरपंच दीपक चिमटे, लक्ष्मण देवकर, अलका घोडेकर, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पना एरंडे, सुहास वाघ, हरिभाऊ गेंगजे, सीमा कानडे, यशोदा कोंढवळे, तारा केंगले यांनी परिश्रम घेतले. सुरेखा लोहकरे यांनी सूत्रसंचालन केले. मीरा कोकाटे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT