Dada Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Dada Bhuse : महिलांनी आर्थिक प्रगती साधावी

Goda Festival : गोदा महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी वितरित करण्यात आलेल्या ८० उमेद मार्टच्या साहाय्याने महिला बचत गटांनी आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

Team Agrowon

Nashik News : राज्य शासन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना राबवीत असून, या योजनांचा महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. तसेच गोदा महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी वितरित करण्यात आलेल्या ८० उमेद मार्टच्या साहाय्याने महिला बचत गटांनी आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

डोंगरे वसतिगृह मैदानावर गोदा महोत्सवाच्या माध्यमातून उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी महिला बचत गटांच्या विभागीय मिनी व जिल्हास्तरीय सरस वस्तू विक्री व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या गोदा महोत्सवाच्या उद्‍घाटन प्रसंगी पालकमंत्री भुसे बोलत होते.

या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांच्यासह नाशिक व छत्रपती संभाजीनगर विभागातील महिला बचत गटांच्या सदस्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

योजनांच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास होऊन त्या स्वावलंबी होण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरी भागात ही बचत गटांच्या माध्यमातून महिला स्वत: सोबतच इतर महिलांची देखील उन्नती करून कुटुंबाला सक्षमपणे आर्थिक हातभार लावण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या जागा महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच उमेद मार्टच्या माध्यमातून देण्यात येणारे स्टॉल हे प्रत्येक बचत गटाला १५ दिवसांसाठी देण्यात येणार असल्याने या उमेद मार्टमधून देखील बचत गटांना त्यांचे उत्पादन विक्री करण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे. यासाठी मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या उमेद मार्टची संख्यादेखील वाढविण्यात येईल, असे भुसे यांनी या वेळी सांगितले.

...या उद्योजिकांचा झाला सन्मान

सविता अमोल व्यवहारे (भारम, ता. येवला), कल्पना गोविंद म्हस्के (मुसळगाव, ता. सिन्नर), ज्योती निकम व संगीता निकम (गुगुळगाव, ता. मालेगाव), रेखा महेंद्र जाधव व विद्या संदीप भुसारे (पेठ), शीतल ढोकरे (खेडगाव, ता. दिंडोरी), शीतल सोपान करंजकर (गोवर्धन, नाशिक).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्याचा भाव दबावात, कापूस आवक वाढली; सोयाबीनमध्ये चढ-उतार, हिरवी मिरची आणि डाळिंब भाव तेजीत

Sonalika CNG Tractor: इंधन खर्चात बचत आणि पर्यावरणपूरक असा सोनालिकाचा सीएनजी/ सीबीजी ट्रॅक्टर लाँच; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Soybean MSP: धाराशिवमध्ये हमीभाव केंद्रांवर सोयाबीनची खरेदी संथगतीने

Sangli Water Storage: सांगलीतील प्रकल्पांत ९१ टक्के पाणीसाठा

Rain Update : राज्यात थंडीचा कडाका झाला कमी; ढगाळ हवामानसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT