Solapur Umed Abhiyan : ‘उमेद’मधून सोलापूर जिल्ह्याला १४२ कोटींचे कर्जवाटप

Loan Disbursement in Solapur : उमेद अभियानाचे जिल्ह्याचे २०२३-२४ मधील कर्जवाटपाचे उद्दिष्ट ३२० कोटी आहे. आजपर्यंत १४२ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे.
Umed Abhiyan
Umed AbhiyanAgrowon
Published on
Updated on

Solapur News : उमेद अभियानाचे जिल्ह्याचे २०२३-२४ मधील कर्जवाटपाचे उद्दिष्ट ३२० कोटी आहे. आजपर्यंत १४२ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. परंतु, उद्दिष्टपूर्तीपेक्षा महिलांच्या संसाराला हातभार लागला, याचा जास्त आनंद आहे.

बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी विविध व्यवसाय निर्मिती करून, त्याचे मार्केटिंग करून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले.

सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनी, प्रभाग संघ वार्षिक सर्वसाधारण सभा, आर्थिक साोक्षरता कार्यशाळा व बँक कर्ज वाटप मेळाव्याप्रसंगी सीईओ आव्हाळे बोलत होत्या.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Umed Abhiyan
Crop Loan : पीककर्ज, हमीभावात तफावत

यावेळी प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाच्या प्रकल्प कार्यकारी ज्योती पवार, तालुका अभियान व्यवस्थापक कृणाल पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, ज्योती पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृणाल पाटील, महतवीर घाडगे, महेश साठे, सुधीर पिसे, किशोर बिडे यांनी परिश्रम घेतले.

Umed Abhiyan
Women Impowerment : बचत गटाने दिला रोजगार; शेती केली सक्षम

बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण

सीईओ आव्हाळे म्हणाल्या, की बचत गटाच्या महिलांनी दिलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून बँकेत पत निर्माण करावी. आज बचत गटांना कर्ज देण्यामध्ये बँका सकारात्मक आहेत. बचत गटाच्या अडचणीवर लक्ष असून त्याच्यावर मार्ग काढण्याचा निश्चितच प्रयत्न केले जातील.

सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणे गरजेचे आहे. तसेच बचत गटांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या वस्तूंचे मार्केटिंग झाले पाहिजे. त्याचे लेबलिंग, पॅकेजिंग उत्तम दर्जाचे असावे. बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षम व्हाव्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com