Ajit pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Budget 2024 : राज्यातील महिलांना मिळणार दरमहा १ हजार ५०० रुपये; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला १ हजार ५०० रुपये देण्यात आहे.

Dhananjay Sanap

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला १ हजार ५०० रुपये देण्यात आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आहे. जुलै २०२४ पासून योजना सुरू करण्यात आल्याचं पवार म्हणाले. या योजनेत २१ ते ६० वय असलेल्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.२८) रोजी विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. सध्या महायुती सरकारचं शेवटचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झालं आहे. या अधिवेशनात अजित पवारांनी अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर सावध होत विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, बेरोजगार तरुण आणि महिलांना खुश करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. महिला, शेतकरी, मागासवर्ग आणि तरुण यांचा विकास घडवून आणण्याचा उद्दिष्ट या अतिरिक्त अर्थसंकल्पाचे असल्याचे अजित पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT