Nashik APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik APMC : नाशिक बाजार समितीवर पहिल्यांदाच महिला सभापती

Women Empowerment : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यावर नवीन सभापती निवडीसाठी बुधवारी (ता. १९) सभा झाली.

Team Agrowon

Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यावर नवीन सभापती निवडीसाठी बुधवारी (ता. १९) सभा झाली. या वेळी समितीच्या ७३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सभापतिपदी महिलेची निवड झाली. सभापतिपदी कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बुधवारी (ता. १९) बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत सकाळी अकराला प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षेतखाली व बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप यांच्या उपस्थितीत सभापतिपदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.

सभेस सर्व संचालक उपस्थित होते. सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच मावळते सभापती पिंगळे निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकत उत्तम खांडबहाले आणि कड या दोन संचालकांसमवेत निघून गेले.

चुंभळे यांचे सभापतिपदासाठीचे तिन्ही अर्ज वैध झाले. दोन अर्ज मागे घेऊन एकच अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी डॉ. मंगरुळे यांनी चुंभळे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. संचालक शिवाजी चुंभळे, राजाराम धनवटे, प्रल्हाद काकड, धनाजी पाटील, तानाजी करंजकर या संचालकांसह पिंगळे गटातून निवडून आलेले ज्येष्ठ संचालक संपतराव सकाळे, उपसभापती विनायक माळेकर, युवराज कोठुळे, भास्कर गावित, जगनाथ कटाळे, सविता तुंगार, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे, संदीप पाटील आदींसह समर्थक उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांच्या घोषणा

गिरणारे, शिंदे, पळसे या उपबाजार समित्यांसाठी तरतूद

बाजार समिती परिसरातील स्वच्छतागृहांची दुरुस्ती, स्वच्छ पाण्याची व्यवस्था

हरसूल आणि त्र्यंबकेश्वर बाजारांचा विकास

पारदर्शक कारभार, बाजार समिती भ्रष्टाचारमुक्त करण्याचा निर्धार

नाशिक रोड मार्केटचा विस्तार

व्यापारी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करणार

बाजार समितीवर आर्थिक भार टाकणारा खत प्रकल्प सर्वानुमते रद्द करण्याचा निर्णय

व्यापारी व महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करणार

पेठ तालुक्यात नवीन मार्केट

आधुनिक सुविधांसह नाशिक बाजार समितीला जागतिक स्तरावर नेण्याचे लक्ष्य

पिंगळे यांच्या कार्यकाळातील भ्रष्ट कारभाराची चौकशी करून, दोषींवर कारवाई करणार आहे. बाजार समितीतील महिलांना सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. बंद पडलेली स्वच्छतागृहे सुरू करेन. पाणपोई सुरू करून वाहनतळाचा प्रश्न मार्गी लावणार आहे.
- कल्पना चुंभळे, नवनिर्वाचित सभापती
नाशिक बाजार समितीत ३० ते ३५ वर्षे कारभार करताना शेतकरीहिताचे निर्णय घेतले आहेत. हमाल, व्यापारी, मापाऱ्यांसह सर्वच घटकांना न्याय दिला. चुकीचे आरोप सुरू असून सर्व चुकीच्या प्रवृत्तीचे लोक एकत्र आले. त्यांच्या या चुकीच्या आर्थिक प्रस्तावाला नकार दिल्याने सर्व संचालक चुंभळे गटात गेले. भविष्यात बाजार समिती डबघाईस जाण्याची शक्यता आहे.
- देवीदास पिंगळे, माजी सभापती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT