Tiger Attack agrowon
ॲग्रो विशेष

Tiger Attack : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

Tiger Attack Chandrapur : मृत महिलेचे नाव भूमिका दीपक भेंडारे (वय ३०) असे आहे. सलग दुसऱ्या दिवशी मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याने खळबळ उडाली आहे.

Team Agrowon

Woman Killed Tiger Attack : मूल, जि. चंद्रपूर : तेंदूपाने गोळा करण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसमवेत जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवारी (ता. १२) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान भादुर्णी बिटाच्या कम्पार्टमेंट नंबर ७९३ मध्ये घडली. मृत महिलेचे नाव भूमिका दीपक भेंडारे (वय ३०) असे आहे. सलग दुसऱ्या दिवशी मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याने खळबळ उडाली आहे.

तेंदूपानांचा हंगाम सुरू झाल्याने सर्वत्र संकलनाचे काम सुरू आहे. त्यासाठी जंगलाशेजारील गावांतील मजूर तेंदूपाने गोळा करण्यासाठी जंगलात जातात. भूमिका दीपक भेंडारे ही महिला पती, वडील, काका आणि काकू यांच्यासोबत जंगलात तेंदूपाने गोळा करण्यासाठी सकाळी गेली होती.

तेंदूपाने गोळा करीत असताना त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने भूमिकावर हल्ला करून जागीच ठार केले. घटना घडलेले ठिकाण बफर झोनमध्ये येते. नियतक्षेत्र भादूर्णी बिटाच्या शिवापूर चक या परिसरात हा भाग येतो. भादूर्णी येथील पाच सहा मजूरच तेंदूपाने गोळा करण्यासाठी गेले होते. भूमिका ही आपल्या माहेरी आईवडिलांकडे पती सोबत राहत होती. या घटनेने भादुर्णीत हळहळ व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Aid: ‘पीएम केअर’मधून शेतकऱ्यांना ५० हजार कोटी द्या : ठाकरे

Nanded Heavy Rainfall: नांदेडला पुन्हा जोरदार पावसाचा तडाखा

National Coconut Conference: गोव्यात १० ऑक्टोबरला राष्ट्रीय नारळ परिषद

Monsoon Heavy Rain: लातूर, धाराशिवमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच

Solapur Flood Situation: सोलापुरात पुन्हा पाऊस; पूरस्थितीची धडकी

SCROLL FOR NEXT