Agriculture News : वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वर्धापन दिनानिमित्त मागच्या दोन दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या संस्थेमार्फत ऊस शेतीमध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या कृषी विभागातील अधिकारी, साखर कारखाने, उसाचे भरपूर उत्पादन घेणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यंदा राज्यातील सर्वांत जास्त उसाचे उत्पन्न घेणारी व्यक्ती ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या मजरेवाडी गावच्या महिला शेतकरी विमल चौगुले या उसभूषण पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांना कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकरी १५० टन उसाचे उत्पन्न घेत राज्यात प्रथम त्यांनी मिळवला.
दरम्यान, विमल चौगुले यांनी सप्टेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात उसाची लागण केली. लागण करण्यापूर्वी शेतीची पूर्ण मशागत करत त्यांनी जमीन कसदार बनवली यानंतर शेतीत योग्य व्यवस्थापन आणि जास्तीत जास्त सेंद्रीय खतांचा वापर केला.
यामध्ये त्यांनी सेंद्रिय खते आणि योग्य व्यवस्थापनातून शेतीमधून चांगले उत्पन्न काढू शकतो हे विमल चौगुले यांनी प्रत्यक्षपणे दाखवून दिलं आहे. पिकांना पोषक अन्नद्रव्ये मिळण्यासाठी ते दरवर्षी पिकांची फेरपालट करतात. केळी आणि मिरचीची बेवड उस पिकासाठी फायद्याची ठरते असं विमल चौगुले यांनी सांगितलं आहे.
सध्या रासायनिक खतांचा भरमसाठ वापर होत असल्याने जमिनीचा पोत खालावत चालला आहे. यामुळे चौगुले यांनी रसायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रीय खतांचा वापर केला. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय करतात यामुळे घरी जनावरे असल्याने त्यांना शेणखत उपलब्ध होते.
त्याचबरोबर शेतातील पालापाचोळा आणि उसाचे पाचटही शेतातच कुजवले जाते त्यामुळे मातीतील सेंद्रीय कर्ब वाढण्यास मदत होते. माती परिक्षण करून मातीत कोणते अन्नद्रव्ये कमी आहेत हे तपासून त्यानुसार खत व्यवस्थापन त्यांनी केले. ऊस शेतीत पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जात असल्याची माहिती विमल चौगुले यांनी दिली.
पुरस्कार आणि पुरस्कार जाहीर झालेल्या शेतकऱ्यांची नावे
राज्यस्तरीय उसभूषण पुरस्कार
विमल चौगुले (कोल्हापूर), पोपट महाबरे (जुन्नर, पुणे), अनिकेत बावकर (मुळशी, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.