Pandharpur Darshan Agrowon
ॲग्रो विशेष

Pandharpur Darshan: ‘व्हीआयपी’ दर्शन बंद केल्याने, १५ तासांचे दर्शन ५ तासांवर

Ashadhi Wari 2025: यंदा आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वारी काळात पदस्पर्श दर्शनासाठी लागणारा तब्बल १५ ते १६ तासांचा वेळ, आता केवळ ५ तासांवर आला आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News: यंदा आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वारी काळात पदस्पर्श दर्शनासाठी लागणारा तब्बल १५ ते १६ तासांचा वेळ, आता केवळ ५ तासांवर आला आहे. त्यामुळे वारकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

आषाढी एकादशी सोहळ्याला केवळ एक दिवस उरला असल्याने या आनंदसोहळ्यात सहभागासाठी पंढरपुरात विविध संतांच्या पालख्या आणि दिंड्यांसह वारकऱ्यांची मांदियाळी वाढली आहे.

प्रदक्षिणामार्ग, मुखदर्शन रांगेतून हजारो वारकरी दर्शन घेऊन बाहेर पडत आहेत. त्यातही पदस्पर्श दर्शनाच्या रांगेत दोन लाखांपेक्षा अधिक वारकरी उभे आहेत. इतर वेळेला दर्शन रांग गोपाळपूरच्या पत्राशेडमध्ये असताना वारकऱ्यांना १५ ते १६ तास इतका वेळ दर्शनासाठी लागत असे.

परंतु यंदा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंदिर समितीला सक्त ताकीद देत व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय असा प्रकार आढळल्यास मंदिर समितीवरच कारवाईचा इशारा दिल्याने या निर्णयाचे तंतोतंत पालन केले जात आहे. परिणामी, दर्शनासाठी लागणारा १५-१६ तासांचा वेळ केवळ ५ ते ६ तासांवर आला आहे.

वशिल्याचे तट्टू नाराज

दर वर्षी मंदिर समितीसह प्रशासनाकडून ऐन वारीच्या काळात वशिल्याच्या तट्टूंना व्हीआयपीच्या पासचे वितरण होत असते. परिणामी, त्याचा मोठा ताण यंत्रणेवर येत असे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपुरात तयारीचा आढावा घेताना, थेट पदस्पर्श दर्शन टाळत मुखदर्शन घेत वारकरी हेच आमच्यासाठी व्हीआयपी आहेत, असे म्हणत या निर्णयाचा पुरेपूर आदर केला.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही काही दिवसांपूर्वी मुखदर्शन घेत, या नियमाची अंमलबजावणी केली. त्यामुळे स्वतः मंत्रीच या पद्धतीने दर्शन घेत असल्याने, वशिल्याने दर्शन मागणाऱ्या तट्टूंची चांगलीच गोची झाली आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर वारकरी खूष आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT