Dhananjay Munde  Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Munde : गैरव्यवहार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना देणार विशेष प्रशिक्षण

Assembly Winter Session : अकोला जिल्ह्यातील कीटकनाशकांच्या गैरव्यवहारातील आरोपी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, यासंबंधी नेमलेल्या सत्यशोधक समितीच्या अहवालानुसार पुढील चौकशी सुरू आहे.

Mahesh Gaikwad

Pune News : पोकरा योजनेतील (नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना) अनियमितचे प्रकरण ताजे असतानाच आता राज्यातील कृषी विभागातील अनियमिततचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कीटकनाशके व इतर शेतमालाच्या साठ्यातील गैरव्यवहाराची प्रकरणे कायमस्वरूपी थांबविण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

अकोला जिल्ह्यातील महामंडळाच्या विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या वाशिमकर नावाच्या स्टोअर किपरच्या ताब्यात ३८ पोती कीटकनाशके सापडल्यानंतर त्यानंतर मुंडे यांनी हे वक्तव्य केले आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना मुंडे बोलत होते.

मुंडे म्हणाले की, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे. अकोला जिल्ह्यातील कीटकनाशकांच्या गैरव्यवहारातील आरोपी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, यासंबंधी नेमलेल्या सत्यशोधक समितीच्या अहवालानुसार पुढील चौकशी सुरू आहे.

तसेच तसेच संबंधित कर्मचाऱ्यावर अकोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भविष्यात असे गैरप्रकार घडू नयेत, यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आगामी काळात विशेष प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

पोकरा योजनेतही अनियमितता

महाराष्ट्रातील पोकरा योजनेतील अनियमितता समोर आली आहे. या प्रकरणी चुकीच्या पद्धतीने अनुदान घेतल्याचे समोर आले आहे. हे प्रकरणसुध्दा अकोला जिल्ह्यातीलच आहे.

अकोला जिल्ह्यातील पोकरा प्रकल्पांतर्गत कृषी अवजारे व ट्रॅक्टर वितरणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. अवजारे बँक घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. दरम्यान, याच जिल्ह्यात कीटकनाशकांच्या गैरव्यवहाराचे प्रकरणही समोर आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT