Donald Trump Agrowon
ॲग्रो विशेष

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेवर येणार का?

Article by Sanjiv Chandorkar : डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल चर्चा.

Team Agrowon

President of the United States : डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल चर्चा तर करावीच लागणार. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प उमेदवार असतील हे हळूहळू नक्की होत चालले आहे

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मालमत्ता लपवणे / कर न भरणे या संदर्भात सुरू असलेले खटले त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या आड येणार नाहीत हे देखील स्पष्ट होत आहे. अर्थातच, रिपब्लिकन उमेदवारी मिळाल्यानंतर ट्रम्प आपोआप अमेरिकेचे देखील राष्ट्राध्यक्ष बनतील असा त्याचा अर्थ नाही. पण डेमोक्रॅटिक पक्षातर्फे तोळामासा जो बायडेन उमेदवार असतील तर डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता वाढेल असे जाणकारांचे अंदाज आहेत

हा अमेरिकेचा अंतर्गत मामला; आपण भारताचे नागरिक / भारताचा या सगळ्याशी काय संबंध, असा प्रश्‍न तुम्हाला नक्कीच पडला असेल. भारत-अमेरिका संबंधांबद्दल आपण हे म्हणत नाही आहोत; तो देखील महत्त्वाचा विषय आहे, पण आजचा आपला मुद्दा वेगळा आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक तत्त्वज्ञान एका शब्दात सांगायचे तर : अमेरिका प्रथम (अमेरिका फर्स्ट); ज्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि अर्थातच भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात

भारताने विश्‍वगुरू वगैरे बनण्याचा नाद सोडून, बदलत्या परिस्थितीला प्रतिसाद देत आपल्या स्वतःच्या देशांतर्गत बाजाराला / अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करण्याकडे लक्ष द्यावे

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेवर आले तर काय होईल?

ट्रम्प स्वसंरक्षणात्मक आर्थिक धोरणे अमलात आणतील. हे म्हणजे क्रिया प्रतिक्रियांसारखे असते. दुसऱ्या राष्ट्रांना देखील स्वसंरक्षणात्मक पवित्रे घ्यावे लागणार

आयात मालावर घसघशीत आयात कर लावतील ; सध्या अमेरिकेत सरासरी आयातकर २ टक्के आहे तो ते १० टक्के करतील असे सांगितले जाते. आणि चिनी मालावर तर त्याहून जास्त

अमेरिका चीनमधील सुरू असणारे व्यापार ‘शीत युद्ध'' अधिक उष्ण होईल; ज्याचे परिणाम दूरगामी असतील.

जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) एक पाय ट्रम्प यांनी आधीच तोडला होता, आता तिचा दुसरा पाय देखील तोडतील; त्याचा परिणाम ऊर्जा / धान्य / धातू यांच्या जागतिक व्यापारावर होणे अपरिहार्य आहे.

गेली ४० वर्षे विकसित झालेल्या जागतिक उत्पादन साखळ्या (ग्लोबल व्हॅल्यू चेन्स) अजून तुटतील.

(लेखक प्रख्यात अर्थविश्‍लेषक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT