MLA Rahul Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : म्हशीच्या दुधाला अनुदानाची मागणी करणार

MLA Rahul Patil : गायीच्या दुधाप्रमाणे म्हशीच्या दुधाला देखील प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शासनाकडे करणार आहोत, असे आश्‍वासन परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिले.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात शेतीपूरक दुग्ध व्यवसायाचा विस्तार होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी दूध संकलनात प्रतिदिन १ लाख लिटरपर्यंत वाढ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. गायीच्या दुधाप्रमाणे म्हशीच्या दुधाला देखील प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शासनाकडे करणार आहोत, असे आश्‍वासन परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिले.

साबर डेअरीअंतर्गत किसान कृपा दूध शीतकरण केंद्र व पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागातर्फे बुधवारी (ता. ७) परभणी मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड आर. पी. हॉस्पिटल परिसरात दूध उत्पादक शेतकरी मेळावा घेण्यात आला. या वेळी आमदार डॉ. पाटील बोलत होते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी एस. व्ही. गिणगिणे, पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उदय कुलकर्णी, भूषण चांडक, झिंकल पटेल, पोपट देसाई, वैभव बारहाते, के. पी. सिंग, दुष्यंत कुमार आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. मणी म्हणाले, की मुबलक पाणी, चारा यामुळे आगामी काळात परभणी जिल्हा हा दुधाच्या बाबतीत संपन्न होईल. कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. या वेळी यशस्वी दूग्ध व्यवसायाची पंचसूत्री, उच्च वंशावळीच्या कालवडीची पैदास व संगोपन, पशूविना, पशुधन खरेदीसाठी बँकांद्वारे सुलभ कर्जपुरवठा आदींविषयी माहिती देण्यात आली. या प्रसंगी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सिताफळाला चांगला उठाव; हळदीचे दर स्थिरावले, शेवगा दर तेजीतच, गाजराला उठाव तर मुगाचा भाव दबावातच

Water logging: विहिरींचे पाणी ओढ्यांना, जमिनीत वाफशासाठी धडपड

Reptile Research: सापाचे घन मूत्र देणार उपचारांना दिशा

Paus Andaj: आज, उद्या पावसाची शक्यता; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता

Okra Farming: भेंडी पीक काढणीला गती; शिवार खरेदीत २५ रुपयांपर्यंत दर

SCROLL FOR NEXT