Milk Adulteration : नगरच्या राहुरी, कोपरगाव आणि कर्जतमधील ११ दूध संकलन केंद्रावर भेसळीप्रकरणी कारवाई

Milk Adulteration Case : काहीच दिवसांपूर्वी राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दूध भेसळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर आता विखे यांच्याच जिल्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. 
Milk Adulteration
Milk AdulterationAgrowon
Published on
Updated on

Ahmednagar News : राज्यातील दूध भेसळीवरून कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. तर पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी देखील थेट कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर आता मंत्री विखे यांच्याच जिल्ह्यात मोठी कारवाई दूध भेसळ प्रतिबंधक समितीने केली आहे. ही कारवाई नगरमधील ११ दूध संकलन केंद्रावर करण्यात आली असून भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले आहे. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी पी.बी. पवार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एस. पालवे व जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीष सोनोने हजर होते. 

नगरच्या दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्यावतीने राहुरी, कोपरगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यात मोठी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या कारवाई अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ११ दूध संकलन केंद्रावर घडक कारवाई करण्यात आली. यावेळी संबंधित  केंद्रावरील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यासह भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात दूध भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

Milk Adulteration
Adulterated Milk : दूध भेसळीविरोधात होणार कठोर कारवाई; स्वतंत्र कायदा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दूध भेसळ प्रतिबंधक समितीने राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील जगदंबा दूध संकलन केंद्र, जगदंबा माता दूध संकलन केंद्रावर २८ जुलै रोजी कारवाई केली होती. तसेच शिलेगावातील पतंजली दूध संकलन केंद्रावर देखील पाहणी करण्यात आली होती. यानंतर १ ऑगस्ट रोजी कोपरगाव येथील साई अमृत दूध संकलन केंद्र, धोंडेवाडी येथील नारायणगिरी दूध संकलन केंद्र यथे कारवाई करण्यात आली. या सर्व ठिकाणचे दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. 

तसेच कर्जत तालुक्यातील कृष्णाई दुध शितकरण केंद्रावर ४ जुलै रोजी कारवाई करत १२०० लीटर दुध नष्ट करण्यात आले. तसेच जामखेड तालुक्यातील खर्डा येथील कृपा दूध संकलन केंद्रावर देखील कारवाई करण्यात आली असून येथील ३८०० लीटर दुध नष्ट करत दुधाचे नमुने दूध भेसळ प्रतिबंधक समितीने घेतले आहेत. कृष्णाई दुध शितकरण केंद्रावर कारवाई करत दुधाचे नमूने घेण्यात आल्यानंतर गजानन महाराज मिल्क व प्रोडक्टसवर देखील कारवाई समितीने केली आहे. तर येथील ४२०० लीटर दूध नष्ट करण्यात आले आहे. 

Milk Adulteration
Adulteration in Milk : FSSAI ने सांगितली भेसळ दूध ओळखण्याच्या सिंपल ट्रीक्स; पाहा काय आहेत त्या...

नगरच्या दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्यावतीने राहुरी, कोपरगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यात करण्यात आलेल्या कारवाईचे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ अजित नवले यांनी स्वागत केले आहे. तसेच दुधातील भेसळ थांबवण्यासाठी होत असलेल्या कारवाई ही दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाचा परिणाम आहे. मात्र या कारवाया केवळ आंदोलन सुरू असल्याने केल्या जात असून त्या नंतर चालतील की नाही याची माहिती नाही. पण अशा कारवाया सतत व्हायला हव्यात, अशी मागणी नवले यांनी केली आहे.

तसेच कारवाई करण्यासाठी विशेष मनुष्यबळ आणि यंत्रणा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. भेसळीच्या दुधामुळे दूध उत्पादकांच्या दरावर विपरीत परिणाम होतोच, सोबत नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा अत्यंत वाईट परिणाम होत असतो. अनेक दुर्धर आजार जडतात. त्यामुळे ग्राहक व शेतकरी दोघांच्या हितासाठी ही मोहीम अत्यंत प्रामाणिकपणाने, पारदर्शक पणाने, व कठोरपणाने राबवली पाहिजे, अशी अपेक्षा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक नवले यांनी व्यक्त केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com