Textile Park Agrowon
ॲग्रो विशेष

Textile Park : कॉटन बेल्टला प्रतीक्षा टेक्स्टाईल पार्कची

Yavatmal Cotton Belt : देशात सर्वात लांब धाग्याचा व उच्च प्रतीचा कापूस हा यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात पिकवला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कापसाला मोठी मागणी आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : देशात सर्वात लांब धाग्याचा व उच्च प्रतीचा कापूस हा यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात पिकवला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कापसाला मोठी मागणी आहे. या भागाला ‘कॉटन बेल्ट’ म्हटले जात असले तरी येथील शेतकऱ्यांना टेक्स्टाईल पार्कची प्रतीक्षा कायम आहे.

तालुक्यात ९० टक्के शेतकरी कापूस उत्पादक आहेत. परंतु या तालुक्यात एमआयडीसी किंवा लहान मोठा उद्योगधंदा तसेच कापसावर आधारित प्रक्रिया करणारा एकही उद्योग नाही.

निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्णी येथे जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी या भागात टेक्स्टाईल पार्क उभारण्याचे आश्‍वासन दिले होते. आता मुख्यमंत्री आपला शब्द पाळतील का, याकडे लक्ष लागले आहे.

एकमेव सूतगिरणी जमीनदोस्त

पांढरकवडा येथे कापसावर आधारित प्रक्रिया करणारी एकमेव सूतगिरणी होती. त्यामुळे हजारो हातांना काम मिळाले होते. पण राजकीय उदासीनतेमुळे ती आता जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. या भागात टेक्स्टाईल पार्क झाल्यास मोठी रोजगार निर्मिती होईल. तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होईल.

टेक्स्टाईल पार्क व सूतगिरणी हे दोन्ही विषय अत्यंत महत्त्वाचे असून मी या गोष्टीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहे. तसेच हा प्रश्‍न मी सभागृहातसुद्धा मांडला आहे. लवकरच मुख्यमंत्री आपले आश्‍वासन पूर्ण करतील.
- प्रा. राजू तोडसाम, आमदार
आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तालुक्यात एकही उद्योगधंदा नाही. टेक्स्टाईल पार्क झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊन आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला न्याय मिळेल.
- उदय महाजन, शेतकरी
उच्च प्रतीचा कापूस पिकवणारा तालुका म्हणून पांढरकवडा तालुक्याची ओळख असली तरी कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग नाही. येथील शेतकऱ्यांना आपला कापूस कमी दराने विकावा लागत आहे. त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.
- राजेंद्र ठाकरे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT