CCI Cotton Procurement : ‘सीसीआय’ आजपासून गुंडाळणार कापूस खरेदी

Cotton Rate : शेतकऱ्यांच्या घरात १८ टक्‍के कापूस शिल्लक असतानाच भारतीय कापूस महामंडळाकडून(सीसीआय) आजपासून (ता.१५) नोंदणी पर्यायाने ‘खरेदी बंद’ करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
Cotton Market
CCI Cotton Procurement Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : शेतकऱ्यांच्या घरात १८ टक्‍के कापूस शिल्लक असतानाच भारतीय कापूस महामंडळाकडून(सीसीआय) आजपासून (ता.१५) नोंदणी पर्यायाने ‘खरेदी बंद’ करण्याचा घाट घालण्यात आला आहे. परिणामी कापसाचे दर आधीच हमीभावापेक्षा कमी असताना ते आणखी दबावात येण्याची भीती वर्तविली जात आहे.

देशात सरासरी १३० लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते. या वर्षी हे क्षेत्र ११३ लाख हेक्‍टरवरच मर्यादित राहिले. त्यामागे कापसाचे दर दबावात राहत असल्याचे कारण मुख्य होते. मात्र पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली.

महाराष्ट्रात सुमारे ४० लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली. देशातील एकूण ११३ लाख हेक्‍टर क्षेत्रातून १४७५ लाख क्‍विंटल, तर महाराष्ट्रात ४० लाख हेक्‍टर क्षेत्रातून ३७० लाख क्‍विंटल उत्पादकता अपेक्षित असल्याचे कापूस विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी सांगितले.

Cotton Market
Cotton Procurement: राज्यातील १२४ केंद्रांवर १.४ कोटी क्विंटल कापूस खरेदी!

यातील मोठ्या कापसाची विक्री झाली असून सध्या देशभरात २५० ते ३०० लाख क्‍विंटल, तर महाराष्ट्रात ६० ते ७० लाख क्‍विंटल कापूस शिल्लक आहे. भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करीत विक्रीला ब्रेक लावला होता.

मात्र दरात वाढ होण्याची अपेक्षा नसल्याने आता साठवणीतला कापूस विक्रीसाठी बाहेर काढला जात आहे. त्यातच ‘सीसीआय’कडून हमीभाव खरेदी गुंडाळण्याची तयारी सुरू असल्याने कापसाच्या दरात प्रती क्‍विंटल २५० ते ३०० रुपयांची घसरण होण्याची भीती वर्तविली जात आहे.

Cotton Market
Cotton Procurement : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत साडेपंधरा लाख क्विंटल कापूस खरेदी

एक कोटी कापूस गाठींची खरेदी

‘सीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ललित कुमार गुप्ता यांच्या माहितीनुसार, सीसीआयने देशभरात एक कोटी कापूस गाठींची खरेदी केली आहे. यापुढील काळात १५ ते २० लाख कापूस गाठी इतकी आवक होण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. कापूस हंगाम अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.

यंदा बाजारात कापसाचे दर पडलेले आहेत. शासकीय खरेदी शेतकऱ्यांना आधार होता. अजून बराच कापूस शिल्लक आहे. अशातच खरेदी बंद झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शासनाने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे.
- अरविंद नाखले, शेतकरी
अखेरच्या बोंडातील कापूस खरेदीचा दावा करणाऱ्या ‘सीसीआय’कडून नोंदणीआड कापूस खरेदी बंद करण्याचा घाट घालण्यात आला आहे. हा प्रकार चुकीचा आहे. ‘सीसीआय’ बाजारात असेल तरच बाजारात स्पर्धा कायम राहत शेतकऱ्यांना दर मिळेल. आताच कापसाचे दर हमीभावाच्या तुलनेत ५०० ते ६०० रुपये क्‍विंटलने कमी आहेत. यंदा कोणत्याच शेतमालाला हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे ‘सीसीआय’ने बाजारात थांबण्याची गरज आहे.
- ॲड. सुधीर कोठारी, सभापती, बाजार समिती हिंगणघाट
‘सीसीआय’ बाजारात असल्याने दर काही अंशी स्थिर आहेत. ‘सीसीआय’ खरेदी प्रक्रियेतून बाहेर पडल्यास दर आणखी कमी होत प्रती क्‍विंटल २५० ते ३०० रुपयांचे आणखी नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागेल.
- गोविंद वैराळे, कापूस विपणन विषयाचे अभ्यासक
कापसाची वेचणी पूर्ण होत शिवारातील कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला आहे. हा कापूस विक्रीची संधी ‘सीसीआय’ने शेतकऱ्याने उपलब्ध करून देत कापसाच्या नोंदणीसाठी १५ मार्चची डेडलाईन निश्‍चित केली आहे. मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच ‘सीसीआय’ला कापूस विकता येईल. कापूस शेतकऱ्यांच्या घरातच असल्याने नोंदणीत कोणतीच अडचण असावी, असे मला वाटत नाही.
- ललितकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com