Leaders of Farmers Unions Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Unions : ‘अब की बार किसान सरकार’ आणणार

Farmer Unions Leaders : ‘अब की बार किसान सरकार’चा नारा देत, सरकार स्थापन करणार असल्याचा विश्‍वास विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केला.

Team Agrowon

Pune News : महायुती आणि ‘इंडिया’ आघाडी या दोन्ही आघाडी युतीने शेतकऱ्यांना फसविले असून, शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला आहे. यामुळे शेतकरी, कामगार प्रश्‍नांवर समर्थ पर्याय देण्यासाठी शरद जोशी यांच्या मुशीतून तयार झालेल्या विविध शेतकरी संघटना आणि समविचार पक्ष, संघटना, सामाजिक संस्था एकत्र येऊन परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून २८८ विधानसभा मतदार संघांत उमेदवार उभे करणार आहे. ‘अब की बार किसान सरकार’चा नारा देत, सरकार स्थापन करणार असल्याचा विश्‍वास विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केला.

विविध शेतकरी संघटनांचे प्रमुख आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक गुरुवारी (ता. १८) पुण्यात झाली. बैठकीला माजी आमदार वामनराव चटप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, माजी आमदार आणि भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र प्रमुख शंकर अण्णा धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे अनिल घनवट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीची माहिती देताना राजू शेट्टी म्हणाले, ‘‘महाराष्ट्र हे शेतकरी आत्महत्याग्रस्त राज्य बनत आहे. राज्यात दररोज १३ शेतकरी आत्महत्या होत असून, शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. शेती कर्जमाफी, वीजबिल माफी, बेरोजगारी, शेती निविष्ठा जीएसटी मुक्त करण्यासाठी आम्ही शरद जोशींच्या विचाराने प्रेरित झालेल्या शेतकरी संघटना एकत्र येऊन महायुतीच्या सरकारला पर्याय देणार आहोत.

यासाठी समान कार्यक्रमाची आखणी सुरू असून, ३० जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक होणार आहे. विविध जिल्ह्यांमध्ये बैठका होऊन, जिल्हास्तरीय संघटनांना यामध्ये सामावून घेतले जाणार आहे.’’

चटप म्हणाले, ‘राज्यावर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत आहे. सध्या सात लाख कोटींचे कर्ज असून, हे राज्याला भूषणावह नाही. काँग्रेस असो वा भाजप हे विरोधी, सत्ताधारी पक्ष शेतकरी आणि ग्रामीण प्रश्‍नांपासून दूर चालेले आहेत. आम्ही शेतकऱ्यांसाठी प्रभावी पर्याय देणार आहोत.’’धोंडगे म्हणाले, ‘राज्यात परिवर्तन हवे आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’सह सर्व शेतकरी संघटनांना आम्ही एकत्र येण्याचे आवाहन करत आहोत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT