Vegetable Market agrowon
ॲग्रो विशेष

Wild Vegetable : गावरान भाज्या बाजारातून गायब

Unseasonal Rain : यंदा अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल अशा कारणांमुळे या गावठी भाज्यांचे नुकसान झाल्याने उत्पादन घटले आहे. त्यामुळे गावठी किंवा गावरान भाज्या कमी प्रमाणात बाजारात येत आहेत.

Team Agrowon

Pali News : पावसाळा संपल्यावर जिल्ह्यात अनेक शेतकरी आणि आदिवासी वाड्या-पाड्यांवरील बांधव शेतात, परसात, डोंगर उतार व रानमाळावर गावरान भाज्यांची लागवड करतात. मात्र, यंदा अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल अशा कारणांमुळे या गावठी भाज्यांचे नुकसान झाल्याने उत्पादन घटले आहे. त्यामुळे गावठी किंवा गावरान भाज्या कमी प्रमाणात बाजारात येत आहेत. त्यात भाजीपाला क्षेत्रही घटले आहे.

हिवाळी हंगामातील सकस, रुचकर आणि आरोग्यवर्धक स्थानिक भाज्यांना चांगली मागणी असते. या भाज्यांना विकून शेतकरी व आदिवासी महिलांच्या हाती चार पैसे मिळतात. आदिवासींबरोबर काही शेतकरी या भाज्यांची लागवड करतात. दिवाळीपर्यंत बाजारात शिराळे, घोसाळे, कार्ली, माठ, पडवळ, वांगी, भेंडी, काकडी, दुधी, अळूची पाने, गवार, वड्यांची पाने, ठाकरी मिरच्या अशा गावठी भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत होत्या.

रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर न करता; अगदी कमी प्रमाणात सेंद्रिय खतावर तयार झालेल्या गावरान भाज्यांना अधिक मागणी असते. मात्र, मागील दोन आठवड्यांपासून तुलनेत या भाज्यांचे प्रमाण व आवक घटली आहे. परिणामी, भाज्यांच्या किमतीही वधारल्या आहेत. सतत बदलणारे हवामान व अवकाळी पावसामुळे शेतकरी व आदिवासींचा हक्काचा रोजगार निघून जाण्याची भीती आहे, असे सुधागड तालुक्यातील शेतकरी शरद गोळे यांनी सांगितले.

मुंबई-पुण्यातील भाज्यांची विक्री

गावठी किंवा गावरान भाज्यांचे नुकसान झाल्याने प्रामुख्याने आदिवासी महिलांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी नाइलाजाने त्या पुणे-मुंबईतील मंडईतून आलेल्या भाज्या विकत आहेत. मात्र, यामध्ये त्यांना कमी फायदा मिळतो. शिवाय, ग्राहकांना गावठी भाज्या न मिळाल्याने त्यांचाही हिरमोड होत आहे

दिवाळीपर्यंत कंदमुळे मुबलक प्रमाणात मिळत होती; मात्र मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसामुळे कंदमुळे भिजून खराब झाली आहेत. काहींना मोड आले आहेत. त्यामुळे बाजारात कंदमुळे फारशी विक्रीसाठी येत नाहीत.

महागावचे प्रयोगशील शेतकरी अभिजित देशमुख म्हणाले की, अवकाळी पावसामुळे अनेकांच्या भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे. शिवाय, उत्पादनातही घट होत आहे. वातावरणातील बदलामुळे दर्जेदार भाजीपाला तयार होत नाही. म्हणून भाव मिळत नाही. या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे व आदिवासी बंधू-भगिनींचे मोठे नुकसान होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT