Wild Animal Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Crop Damage : केळीसह मका, भाजीपाला पिकांमध्ये वन्यप्राण्यांच्या धुमाकूळ

Crop Loss : खानदेशात पिकांत डुकरे, रोही, नीलगायी, हरणे व अन्य वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पिकांत डुकरे, रोही, नीलगायी, हरणे व अन्य वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे केळीसह मका, भाजीपाला पिकांची मोठी हानी होत असून, शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. केळी पीक वाढीच्या व निसवणीच्या स्थितीत आहे. अनेकांचे पीक निसवले असून, काढणीवर आहे. या बागांत रानडुकरे रोज पहाटे किंवा मध्यरात्री धुडगूस घालतात. झाडांचे नुकसान करतात.

यात झाडे कोसळून त्यावरील घडांचेही १०० टक्के नुकसान होते. कारण एकदा झाड कोसळल्यानंतर त्यातून कुठलेही उत्पादन येत नाही. मका, तूर आदींची पेरणीही झाली आहे. या पिकांतही रानडुकरे व अन्य वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत. धुळे, नंदुरबार व जळगावात सर्वत्र ही समस्या आहे.

सातपुडालगत रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, अक्कलकुवा या भागासह सातमाळालगत पाचोरा, चाळीसगाव, जामनेर आणि अन्य वन क्षेत्रांच्या भागात पिकांची हानी वन्यप्राणी करीत आहेत. अलीकडेच पेरणी केली व ती उद्ध्वस्त झाली, यामुळे शेतकरी वित्तीय संकटात आहेत.

जेव्हा पाऊस नसतो, तेव्हाही नुकसान होते व पेरणी व पाऊसमान चांगले राहिल्यास वन्यप्राणी नुकसान करतात. शेतकऱ्यांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे. वन विभागाला या प्रकाराची माहिती आहे. परंतु नुकसानीनंतर किती शेतकऱ्यांना भरपाई मिळते, हादेखील प्रश्न आहे. ऊस, केळी पिकांत वन्यप्राणी लपून असतात. अनेकदा शेतकऱ्यांवर हल्लेही करतात. परंतु या समस्येबाबत प्रतिबंधात्मक उपाय केले जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

रोजच हानी

अनेक गावांत रानडुकरांनी कहर केला आहे. मका पिकाचे रातोरात मोठे नुकसान होत आहे. काही भागात पूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. पहाटेच्या वेळी किंवा मध्यरात्री रानडुकरे पिकांत धुडगूस घालतात. याची माहिती वन विभागाला दिली जाते. पण पुढे संबधित कार्यवाही करीत नाहीत. सातमाळा, सातपुडा भागात, गिरणा, अनेर, पांझरा, कांग आदी नद्या, वनांच्या क्षेत्रात वन्यप्राण्यांची डोकेदुखी वाढली आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

India US Deal : अमेरिकेसोबतच्या करारात भारत शेतीसह विविध मुद्यांवर ठाम राहणार का?

Solapur DPC Meeting: पीकविमा, वीज, पाणीप्रश्नावर चर्चा

Kharif Sowing: गतवर्षी जादा पाऊस, यंदा कमालीची ओढ

SCROLL FOR NEXT