Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Crop Damage : मक्याची वन्य प्राण्यांकडून नासाडी

Crop Damage : परिसरातील शेती जंगलाच्या शेजारी असल्याने या भागात वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत आहेत.

Team Agrowon

Nanded News : किनवट तालुक्यातील शिवणी येथील दुसऱ्याची शेती कसून उदरनिर्वाह करणारे शेतकरी साईनाथ तोटावाड यांच्या चारपैकी दोन एकरातील मका पिकाची वन्यप्राण्यांनी नासाडी केली असून शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

परिसरातील शेती जंगलाच्या शेजारी असल्याने या भागात वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे वन विभागाने या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा त्वरीत भरपाई द्यावी अशी मागणी शिवणी व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

या परिसरात खरिपाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी अडचणीत आला असतानाच या परिसरात यंदा रब्बी हंगामात मक्काच्या लागवडीत वाढ झाली असून पीक काढणीला आले असताना वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.

रात्रीचा दिवस करून शेतकऱ्यांनी जागरण करून पीक वाढवले असून ऐन भरात असताना पिकाचे नुकसान होत आहे. शेतकरी रात्रीच्या वेळी पिकाची राखण करण्यासाठी जास्तीचा खर्च करून मजुर लावतात.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. तरीही पिकाचे नुकसान होत आहे त्याची जबाबदारी वनविभागाने घ्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांनी वन विभागास कळवल्यानंतर वन कर्मचारी येऊन शेतीचा पंचनामा करतात पण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीच भरपाई मिळत नाही अशी तक्रार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Heavy Rainfall: मराठवाड्यात पिके पाण्याखाली; पावसाचा जोर कायम

Beed Flood Accident: पुरात वाहून गेलेले तिघे बचावले, एकाचा मृत्यू

Maharashtra State Cooperative Union: राज्य सहकारी संघ अध्यक्षपदी आमदार प्रवीण दरेकर बिनविरोध

Chhagan Bhujbal: शेतकऱ्यांमुळे राष्ट्राची प्रगती

Farmers Protest: भाकड पशुधनप्रश्नी आंदोलन करणार

SCROLL FOR NEXT